शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....
Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे.
Education News : शिका आणि समृद्ध व्हा असं काही विद्वान म्हणून गेले आहेत. पण, सर्वांचाच शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकसारखा असेल असं म्हणणं गैर ठरेल. कारण, शैक्षणित कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे दोन टप्पे अर्थात इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही वर्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये अद्यापही अपेक्षित गांभीर्य पाहायला मिळत नसल्याचं स्पष्ट होत आहे.
शिक्षण आणि ओघाओघानं विचारसरणीसह जीवनात येणारे बदल या अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टी ठरत असतानाच देशातील एक मोठा युवा वर्ग याच शैक्षणिक वर्षांमध्ये गटांगळ्या खाताना दिसत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एका अहवालामुळं ही आकडेवारी उघड झाली. जिथं, 2023 या वर्षात देशात 65 लाखांहून अधिक विद्यार्थी इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी च्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचं सांगण्यात आलं.
विविध राज्यांमधील शालेय महामंडळांच्या परीक्षांच्या तुलनेत केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठा असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. देशभरात सध्याच्या घडीला एकूण 56 राज्य शिक्षण मंडळं आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह 59 शालेय मंडळांमधील 10 वी आणि 12 वी च्या निकालाच्या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी शाळांमधून इयत्ता 12 वी च्या परीक्षांसाठी सहभागी होणाऱ्या मुलींचा आकडा मोठा होता. पण, खासगी आणि सरकारी अनुदानप्राप्त शाळांमध्ये मात्र याउलट चित्र पाहायला मिळाल्याचं अहवालातून समोर आलं.
हेसुद्धा वाचा : 'सुप्रीम कोर्टाने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'
शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इयत्ता 10 वी मधील जवळपास 33.5 लाख विद्यार्थी पुढील इयत्तेमध्ये पोहोचण्यास अपयशी ठरलेय. तर, 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. या परीक्षेमध्ये तब्बल 28 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर, 12वी इयत्तेमध्ये 32.4 लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आणि 5.2 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही.
इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा 6 टक्के इतरा असून हा केंद्रीय शिक्षण मंडळाचा आकडा आहे. तुलनेनं राज्य शिक्षण मंडळांणध्ये हाच आकडा 16 टक्क्यांवर असल्याचं पाहायला मिळालं. इयत्ता 12 वीची आकडेवारी पाहिली असता केंद्रीय बोर्डात 12 तर, राज्य शिक्षण मंडळात हा आकडा 18 टक्के इतका आहे.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2023 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनात घट आली असून, परीक्षांसाठी देण्यात येणाऱ्या अधिकाधिक पाठ्यक्रमामुळं हे चित्र पाहायला मिळत असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातही लैंगिक पूर्वग्रहांमुळं असणाऱ्या भेदभावांकडे लक्ष वेधलं.