नवी दिल्ली : Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात मात्र काही महत्त्वाच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. तर, काही कार्यालयांच्या कामकाजालाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. याच धर्तीवर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचं महत्त्वं लक्षात घेत केंद्री. आरोग्य मंत्रालयाकडून काही अटी आणि नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यांचं पालन करणं संबंधित कंपन्यांना आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतर पाळावं. बैठक व्यवस्थेपासून अन्य बऱ्याच कामकाजांमध्ये एक मीटर अंतर ठेवूनच वावरावं. 


- तोंड मास्क किंवा कापडाने झाकावं. 


- थोड्या थोड्या वेळाने साबण किंवा हँड सॅनिटायझरच्या मदतीने हात स्वच्छ करावेत. 


- आजारी असल्यास याची माहिती संबंधित स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवावी. 


- शिंकताना किंवा खोकलाता तोंड झाकावं. 


- कार्यालयात पोहोचताना महत्त्वाची काळजी घेतली गेलीच पाहिजे. गरज नसल्यास वस्तूंना स्पर्श करणं टाळा. 


लॉकडाऊन ४.० : वाहतूक कोंडी पाहून म्हणाल, अरे काय चाललंय काय? 


 


- कोणत्याही कार्यालयातील अमुक एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास मागील ४८ तासांमध्ये त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या परिसराचं तातडीनं निर्जंतुकीकरण करावं. त्यानंतर तेथे पुन्हा कामाची सुरुवात करावी. या एका कारणाने संपूर्ण कार्लाययीन इमारत सील करण्याची गरज नाही. 


- निर्जंतुकीकरणाचे ४८ तासच ही कार्यालयीन इमारत सील असेल. त्या काळात कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात यावी.