LIC Housing Financeच्या व्याजदरांमध्ये ऐतिहासिक कपात; लगेच डिटेल्स तपासा
आपले घर खरेदी करण्याचे स्वप्न सर्वांचेच असते. जर तुम्ही घर खरेदीचा विचार करीत असाल तर, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. गृह कर्ज देणारी कंपनी LIC Housing Finance ltd ने मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : आपले घर खरेदी करण्याचे स्वप्न सर्वांचेच असते. जर तुम्ही घर खरेदीचा विचार करीत असाल तर, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. गृह कर्ज देणारी कंपनी LIC Housing Finance ltd ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने गृह कर्जाच्या व्याजदरांध्ये कपात केली आहे. आता व्याजदर 6.66 टक्के असणार आहेत.
LIC हाऊसिंग फायनान्स ऑफर
एलआयसी हाऊसिंग फायनान्सने 50 लाखापर्यंतच्या कर्जावर व्याज दर कमी केले आहेत. याचा लाभ फक्त मर्यादित अवधीसाठी घेता येणार आहे. ही योजना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असणार आहे. अटीनुसार पहिल्या हफ्त्याचे पेमेंट 30 सप्टेंबरच्या आधी असणे गरजेचे आहे.
30 वर्षात सर्वात कमी व्याज दर
कंपनीने म्हटले आहे की, 6.66 टक्के हा व्याजदर आतपर्यंतच्या ३० वर्षातील सर्वात स्वस्त व्याजदर आहे. कंपनीने ऍप लॉंच केले आहे. HomY या ऍपच्या माध्यमातून गृहकर्जासाठी अर्ज करता येईल. केलेल्या अर्जाची स्थिती तपासता येईल.