Cooking Tricks : बऱ्याचदा आपण रेस्टोरेंट मध्ये ज्या भाज्या खातो , त्या घरी बनवून खाण्याचा प्रयत्न करतो सगळं प्रमाण वेगैरे व्यवस्थित घालतो पण नेमकं काहीतरी चुकत आपला जेवण हॉटेल सारखं का बनत नाही किंवा ग्रेव्ही मुख्यतः का तशी दिसत नाही आणि तशी टेस्टला लागतसुद्धा नाही ? हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना (smart kitchen tricks) पडलेला असतो. रेस्टॉरंट मधील भाज्या आणि घरी बनवलेल्या भाज्या यांचा रंग आणि चव वेगवेगळी असते. चला तर मग आज जाणून घेऊया रेस्टोरेंट स्टाईल ग्रेव्ही बनवण्याची खास पद्धत आणि काही खास कुकिंग टिप्स ज्या तुम्हाला नक्कीच मदत करतील, आणि सगळे जण तुमच्या हाताची भाजी खाऊन वाहव्वा करतील हे नक्की . (how to mmake restaurent style gravy at home)


 जाणून घ्या घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी टेस्टी ग्रेव्ही बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    भाजीसाठी ग्रेव्ही बनवताना त्यात तेलाऐवजी तूप वापरा. त्यामुळे ग्रेव्हीला एक वेगळाच स्वाद येतो आणि  छान तवंग येतो . (cooking tips)

  • ग्रेव्हीसाठी जे मसाले वापरणार आहेत ते मंद आचेवर छान भाजून घ्यावेत. त्यामुळे मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि मसाल्यांची चव टिकून राहते. याउलट फास्ट आचेवर मसाले भाजले तर त्याचा अरोमा म्हणजेच सुगंध जळून जातो. 

  • काश्मिरी मिरची पावडर वापरल्याने ग्रेव्हीला छान रंग येतो.  

  • बाजारातून लाल लांब मिरच्या घेऊन त्या चांगल्या उन्हात वाळवून घ्या , आणि घरच्या घरी जाडसर पावडर बनवून घ्या. 

  • मसाले मंद आचेवर भाजून घ्यावेत. यामुळे त्याचा रंग आणि चव टिकून राहते.

  • भाजीसाठी ग्रेव्ही बनवताना , त्यात आलं लसणाची पेस्ट नक्क्की घाला 

  •  आलं लसूण पेस्ट वापरताना नेहमी ६० टक्के लसूण आणि ४० टक्के आलं वापरा.  (cooking hacks) कारण, आलं खूप स्ट्रॉंग असतं. त्यामुळे तुमची डिश तिखट होईल. 

  •   ग्रेव्हीमध्ये लाल रंग टिकवून ठेवायचा असेल तर लालबुंद टोमॅटो वापरावे . एक लक्षात ठेवा टोमॅटोचा रंग हिरवा असेल तर, तू अजाबात वापरू नका याने ग्रेव्ही आंबट होते शिवाय भाजीचा रंगसुद्धा फिका होतो.  

  • ग्रेव्हीमध्ये काजू आणि बिया दुधामध्ये मिसळून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या, याने ग्रेव्हीला रिचनेस येतो.  (cooking tips)