Viral Story : देशात लग्नाचा माहोल सुरु आहे. जागोजागी लाईटींग दिसतायत, ढोल-नगाडे वाजतायत. या लग्नाच्या वातावरणात अनेक अशा लव्हस्टोरी समोर येत आहेत. या लव्हस्टोरी (Love Story) वाचून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हालं. अशीच एक लव्हस्टोरी आता समोर आली आहे. यामध्ये एका नायजेरियन तरूणाने भारतीय तरूणीशी लग्नगाठ बांधल्याची घटना समोर आली आहे. ही लव्हस्टोरी (Love Story) वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  


हे ही वाचा : वडिलांच्या श्राद्धाला मुलीचा लज्जतदार जेवणावर ताव, नेटकरी संतापले, पाहा Video


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अशी प्रथम भेट झाली?


चेन्नईची रहिवासी असलेल्या कल्पा आणि लागोसचा (indo nigerian Love Story) रहिवासी टोमिडे अकिन्येमी यांची 2015 साली प्रथम भेट झाली होती. या दोघांनी एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये (Beauty Contest) भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी एक मुलगा आणि मुलगी अशी जोडी हवी होती. आणि या स्पर्धेत कल्पा आणि लागोस एकएकटेच होते. यावेळी दोघांनी एकत्र येऊन स्पर्धा खेळण्याचा निर्णय़ घेतला होता.आणि त्यांनी स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेनंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली होती. 


5 वर्ष डेट केलं 


कल्पाचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता.तिचे वडील संयुक्त राष्ट्रात काम करायचे. त्यामुळे त्यांना कामासाठी कुटूंबियासह केनियाला जावे लागले होते. नायजेरीत काही वर्ष राहिल्यानंतर तिचे आई-वडील भारतात परतले होते. पण कल्पाचा अभ्यास चालू असल्याने ती केनियातच राहिली होती.यावेळी अभ्यासादरम्यानच कल्पाची भेट टॉमिडेशी एका सौंदर्य स्पर्धेत झाली.


टॉमिडे मूळचा नायजेरियाचा होता. पण नंतर तो आपल्या कुटुंबासह केनियामध्ये शिफ्ट झाला. येथेच तो राहिला आणि शिकला. स्पर्धेदरम्यान झालेल्या भेटीनंतरच या जोडप्याची जवळीक वाढू लागली होती. कल्पा आणि टॉमिडे एकमेकांना आवडू लागले होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. 


लग्नबंधनात अडकले


दोघांनी साधारण 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये कल्पा आणि टोमिडेचे लग्न झाले होता. आता हे जोडपे टोमिडच्या कुटुंबासोबत लागोस, नायजेरिया येथे राहतात. सध्या कल्पा एक प्रोजेक्ट मॅनेजर आणि मॉडेल आहे. तर टोमिडे हा क्रिएटीव्ह आणि डिजिटल स्ट्रेटेजिस्ट आहे.  



व्हिडिओ व्हायरल 


सध्या या इंडो-नायजेरीयन (indo nigerian) जोडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जोडप्याने सांगितले की, लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म होणार आहे. दोघेही या गोष्टीमुळे खुप आनंदी आहेत. या व्हिडिओवर चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.  


हे इंडो-नायजेरीयन (indo nigerian) कपल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून अनेक गोष्टींची माहिती देत असते. या जोडप्याचे यूट्यूब चॅनलवर जवळपास 1 लाख सबस्क्राइबर्स झाले आहेत. त्याचबरोबर या जोडप्याचे इंस्टाग्रामवर जवळपास 7.5 हजार फॉलोअर्स आहेत. या कपलची सोशल मीडियावर चर्चा आहे.