Viral Video : वडिलांच श्राद्ध होतं की नवीन वर्षाची पार्टी ? मुलीचा 'हा' Video पाहून नेटकरी भडकले

Noida Girl Shradh Viral Video: यूट्यूब क्रिएटर रोही राय हिच्या वडिलांच निधन झाले होते. या निधनानंतर वडिलांच श्राद्ध (Shradh Viral Video) घालण्यात आले होते. याच दिवशी तिने स्वादिष्ट जेवण खाल्ल होते आणि ड्रिक्स घेतली होती. त्या दिवशी तिने ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या.त्याचा एक व्हि़डिओ बनवला होता. हा व्हिड़िओ तिने सोशल मीडिय़ावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून फॅन्स भडकले आहेत. 

Updated: Dec 20, 2022, 09:16 PM IST
Viral Video : वडिलांच श्राद्ध होतं की नवीन वर्षाची पार्टी ? मुलीचा 'हा' Video पाहून नेटकरी भडकले title=

Noida Girl Shradh Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये एक मुलगी बापाच्या श्राद्धाच्या (Shradh Viral Video) दिवशी लज्जतदार जेवणावर ताव मारतेय आणि ड्रिक्स देखील घेतेय.या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी संतापले आहेत. 

यूट्यूब क्रिएटर रोही राय हिच्या वडिलांच निधन झाले होते. या निधनानंतर वडिलांच श्राद्ध (Shradh Viral Video) घालण्यात आले होते. याच दिवशी तिने स्वादिष्ट जेवण खाल्ल होते आणि ड्रिक्स घेतली होती. त्या दिवशी तिने ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या.त्याचा एक व्हि़डिओ बनवला होता. हा व्हिड़िओ तिने सोशल मीडिय़ावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून फॅन्स भडकले आहेत. 

हे ही वाचा : अजब प्रेमाची गजब गोष्ट!नायजेरियन तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय तरूणी, वाचा भन्नाट Love Story

व्हिडिओत काय? 

यूट्यूबर रोही राय तिच्या व्हिडिओमध्ये सांगते की, तिच्या वडिलांचे श्राद्ध आहे, त्यामुळे ती दिवसातून एकदाच मीठ आणि तेल खाऊ शकते. त्यामुळे तिने नाश्त्यासाठी मॅचा ओटमील ऑर्डर केली होती. ही  डिश खायला खूप चविष्ट होती. त्यामुळे तिने या डिशला 10 पैकी 8 गुण दिले होते. 

व्हिडीओमध्ये (Viral Video) पुढे रोही तिचे लंचही दाखवत आहे. यादरम्यान व्हिडिओमध्ये तिचा मित्र साहिलही दिसत होता. साहिलसोबत ती मेथी पराठा आणि बटाट्याची भाजी खाताना दिसत आहे. आईने बनवलेल्या जेवणाला तिने 10 पैकी 10 गुण दिले आहे. हे सर्व खाल्ल्यानंतर तिने पिंक लेमोनेड ड्रिक्स देखील घेतली आहे.या ड्रिक्सला तिने10 पैकी 2 गुण दिले आहेत.

नेटकरी भडकले 

रोही रायच्या या व्हिडिओमुळे (Viral Video) आता ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. एका य़ुझरने लिहले की, आपला देश कुठे चालला आहे? दुसऱ्या य़ुझरने लिहले की,श्राद्धाच्या नावाने पार्टी आयोजित केली जात आहे. तर तिसऱ्या य़ुझरने लिहले की,श्राद्धाच्या दिवशी चवदार पदार्थ खाल्ले जात नाहीत, असा सल्ला तिला दिला जात आहे.  

दरम्यान नोएडामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत रोही रायचे युट्यूबवर 3 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. तिचा व्हिडिओ यूट्यूब आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची  (Viral Video) सोशल मीडियावर चर्चा आहे.