Rahul Gandhi disqualified LIVE : `राहुल गांधी माफी मांगो...` भाजप उद्या राज्यभर आंदोलन करणार

Fri, 24 Mar 2023-4:35 pm,

Rahul Gandhi disqualified : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.

Latest Updates

  • राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप आक्रमक, राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे उद्या राज्यभर आंदोलन, माफी माँगो राहुल गांधी यासाठी भाजप उद्या राज्यभर आंदोन करणार. भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली होती. राहुल गांधी भारताला बदनाम करतायेत यासाठी भाजपचे आंदोलन असल्याचं शेलार यांनी म्हटलंय. आम्ही कुणाला घाबरत नाही...राहुल गांधी यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल विदेशात जाऊन भारताची बदनामी का केली...भारतात आम्हाला स्वातंत्र्य नाही आम्ही श्वास घेऊ शकत नाही असे खोटे का बोलले असं शेलार यांनी म्हटलंय

  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर अध्यक्षांसोबत चर्चा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेते विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बॅनरवर  सत्ताधारी पक्षाने जोडो मारो आंदोलन केलं होतं. याविरोधात कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती

     

  • प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

    सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केलेले आहे ते अपील करणार आहेत. असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे

  • Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करण्याचा निर्णय हा राष्ट्रपतींद्वारे व्हायला हवा होता. तिथेही राष्ट्रपती निवडणुक आयोगाचा सल्ला घेतात. त्यानंतर निर्णय सुनावतात असं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं. 

  • Rahul Gandhi Disqualified : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी खरं बोलले, याचीच त्यांनी शिक्षा मिळाल्याचं काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं. नोटबंदी, चीनची घुसखोरी, जीएसटी या मुद्दांवर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

  •  Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : मानहानीच्या प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे संसद सदस्यत्व (खासदारकी) रद्द करण्यात आले आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    संबंधित बातम्या :
    Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द

    कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा

    राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; विधानसभेत पडसाद, Nana Patole म्हणतात...

    10 वर्षांपूर्वी 'तो' कागद फाडला नसता तर आज राहुल गांधींची खासदारकी वाचली असती

    "कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल," राहुल गांधींना दोषी ठरवताना कोर्टाने काय म्हटलं? जाणून घ्या निर्णयातील मोठे मुद्दे

  • राहुल यांचे लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत सदस्यत्व रद्द

     Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha :  - लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत सदस्यत्व रद्द होण्याची स्पष्ट कारणे देण्यात आली आहेत. 
    - लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 अनुसार, एखाद्या फौजदारी प्रकरणात दोषी ठरल्यास खासदारकी रद्द करण्यात येते. 
    - 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास आमदार किंवा खासदारकीचं सदस्यत्व रद्द होतं
    - कलम 8(3)नुसार फौजदारी खटल्यात दोषी लोकप्रतिनिधीला दोषी ठरवण्यात आल्याच्या दिवसापासून 6 वर्ष तो व्यक्ती कोणतीही निवडणूक लढू शकत नाही
    - कलम 8(1) नुसार दोन समाजात तेढ निर्माण करणं, भ्रष्टाचार, गैरवर्तन यामुळे कारवाई होऊ शकते
    - 2022मध्ये समाजवादी पक्षाचे नेते चिथावणीखोर वक्तव्यांप्रकरणी आझम खान यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

  • मोदी आडनावावरुन वादग्रस्त वक्तव्य

    Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी मानहानी केली असून ते त्यात दोषी आढळले असे सूरत कोर्टाने म्हटले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांना मानहानी गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली.  2019 रोजी कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता.  2019 मध्‍ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांची सभा होती. यावेळी त्‍यांनी मोदी यांच्‍या नावावरुन वादग्रस्त विधान केले होते. देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता

  • राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द

    Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत.

  • Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केले आहे. गुजरात  येथील सूरत कोर्टाने गुरुवारी राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link