Video : Water ऐवजी निघाली Quarter; हँडपम्प सुरु करताच पोलिसांना बसला धक्का
पोलिसांच्या पथकाने हँडपम्प सुरू करताच त्यांना धक्काच बसला
मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh)एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गुना जिल्ह्यात पाण्याच्या पंपातून (Hand Pump) पाण्याऐवजी (Water) अशी गोष्ट बाहेर पडलीय ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. या हँडपम्पमधून पाण्याऐवजी दारू (Liquor) निघू लागल्याचे व्हिडीओतून समोर आलं आहे. पोलिसांच्या पथकाने हँडपम्प (Hand Pump) सुरू करताच त्यांना धक्काच बसला. मध्य प्रदेशातील गुना येथे पोलिसांचे पथक अवैध दारू बनवणाऱ्यांवर छापे टाकत होते. यावेळी पोलिसांनी हँडपम्प सुरू केला असता पाण्याऐवजी दारू (Liquor) बाहेर पडत असल्याचे आढळले.
यानंतर पोलिसांनी हँडपम्पखाली (Hand Pump) खोदल्यानंतर गावठी दारूने भरलेले अनेक ड्रम आढळून आले. हे ड्रम सुमारे 7 फूट जमिनीत पुरलेले होते. दारू तस्करांनी हँडपम्पखाली हे ड्रम लावले होते. त्याच्यामध्ये बेकायदेशीररीत्या दारू (Liquor) भरण्यात आली होती. गुना गावात शोध सुरू असताना पोलिसांची (Police) नजर या हँडपम्पवर पडली. यानंतर पोलिसांची हँडपम्प सुरु करताच त्यातून दारू निघू लागली. यामुळे पोलिसही हैराण झाले. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा नष्ट केला. आता पोलिसांनी दारू जप्त केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
सध्या मध्य प्रदेशात अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सूचनेवरून पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासन मिळून दारू माफियांवर वेगाने कारवाई करत आहेत. या भागात सर्वांनी मिळून वेगवेगळ्या जिल्ह्यांतील गावठी दारू बनविणाऱ्यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. याआधीही मध्यप्रदेशच्या छतरपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये पाण्याऐवजी हातपंपातून आग निघताना दिसत होती.