गुवाहाटी : "आम्ही कोणीही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत. उद्धव ठाकरे आमचं ऐकतील असा विश्वास आहे. एकनाथ शिंदेंना नेते म्हणून उद्धव साहेबांनीच दिले आहेत.  त्यांनी निवडलेल्या नेत्यांविरोधात आम्ही कोर्टात जाणार", असा इशारा दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) यावेळेस दिला. (maharashtra political crisis rebellious shiv sena eknath shinde group mla deepak kesarkar online press confrence)
 
महाराष्ट्रातील सत्तानाट्य गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेच्या गोटात दाखल होत शिवसेनेलाच पर्यायाने महाविकास आघाडीलाच आव्हान दिलं आहे. या सर्व बंडानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गोटातील आमदार आणि माजी मंत्री  दीपक केसरकर यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत घेत एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडली.


दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

-विधिमंडळात आम्हीच शिवसेना आहोत. 


-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली होती. 


-विधिमंडळात बहुमत सिद्ध करुन दाखवू. 


-आम्ही नोटीशीला कायदेशीर उत्तर देऊ.


-बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडणारे आम्ही एकत्र आलो आहोत. 


-एकनाथ शिंदे हेच आमच्या  गटाचे नेते. 


-बाळासाहेबांचं नाव वापरण्याबाबत काहीही मत झालेलं नाही. 


-शिवसैनिकांनी तोडफोड करु नये, त्यांनी कायद्याचे पालन करावं. 


-उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचं कर्तव्य पूर्ण करावं. 


-राजकीय परिस्थिती पूर्ववत झाल्यावर महाराष्ट्रात येऊ. 


-महाराष्ट्रात येणं सध्या सुरक्षित वाटत नाही.


-कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये. 


-ठाकरेंशी आम्ही चर्चा केली, पण काही उत्तर मिळालं नाही.