सूरत: आपल्या गाावातून कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी एका तरुणाने स्वत:ची जीभ कापून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. रविंदर शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो मध्य प्रदेशच्या मोरेना गावचा रहिवासी आहे. गेल्या वर्षभरापासून तो गुजरातच्या सुईगाम येथील भवानी मंदिरात कामाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळीरामांना प्रयोग भोवले! दारूऐवजी सॅनिटायजर प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू

रविंदरच्या मोरेना गावातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर देवीने आपल्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. गावातून कोरोना घालवण्यासाठी तू स्वत:ची जीभ अर्पण कर, असे देवीने सांगितल्याचे रविंदरचे म्हणणे आहे. या दृष्टांतानंतर रविंदर गुजरातच्या नादेश्वरी मातेच्या मंदिरात गेला आणि ब्लेडने आपली जीभ कापली. जीभ कापताच त्याच्या तोंडातून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे रविंदर जागीच बेशुद्ध पडला. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी रविंदरला तातडीने रुग्णालयात नेले. 


चीनने पाठवलेली ६३ हजार पीपीई किटस निकृष्ट दर्जाची?

या प्रकारानंतर BSF कडून एक परिपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आवाहन BSF ने केले आहे. गुजरातमध्ये रविवारी कोरोनाचे २२८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,६०४ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने आढळून आलेल्या २२८ रुग्णांमध्ये अहमदाबादमधील १४० जणांचा समावेश आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत प्रशासनाकडून एकूण २८,२१२ लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.