मुंबई : शेअर बाजारात केवळ मोठ्या कंपन्याच आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत नाहीत, तर अशा अनेक छोट्या कंपन्याही आहेत जे, त्यांच्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देतात. राघव प्रोडक्टिविटी इनहँसर ही अशीच एक छोटी कंपनी आहे, ज्याकंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीच्या स्टॉकने 5 वर्षात 2700 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच 5 वर्षांपूर्वी लोकांनी त्या कंपनीत गुंतवलेल्या 10 हजार रुपयांचा आज 2 .80 लाख रुपये इतका परतावा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राघव प्रोडक्टिविटी इनहँसर एप्रिल 2016 मध्ये बाजारात लिस्टेट केली गेली. तेव्हा त्यांच्या शेअरची किंमत 28.60 रुपये होती. आज त्याच्या शेअरची किंमत 804.80 रुपये झाली आहे. त्यातुलनेत सेन्सेक्स 101 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 875 कोटी रुपये आहे.


देशातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांनीही पैसे गुंतवले


देशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही कंपनीमध्ये 30.9 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2 ऑगस्ट रोजी झुनझुनवाला यांनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत हा शेअर 716.9 रुपयांवरून 804 रुपये झाला आहे.


या कंपन्यांनाही टाकले मागे


कंपनीने गेल्या पाच वर्षात शेअर बाजारातील परताव्याच्या बाबतीत आपल्या स्पर्धकांना ही मागे टाकले आहे. टाटा स्टीलने (Tata Steel) 239.48 टक्के वाढ केली आहे, तर जेएसडब्ल्यू स्टीलचा (JSW Steel) शेअर पाच वर्षांत 268.47 टक्क्यांनी वाढला आहे.


सेल (SAIL) च्या शेअरमध्ये एक वर्षात 147.43% वाढला आणि यादरम्यान जिंदल स्टीलचा (Jindal Steel)  हिस्सा 369.09% ने  वाढला आहे.


कंपनीची आर्थिक स्थिती


स्टॉकची उत्कृष्ट कामगिरी फर्मच्या आर्थिक स्थितीशी सुसंगत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 638 टक्क्यांनी वाढून 23 लाख रुपये झाला.


पहिल्या तिमाहीत कंपनीची विक्री 127.23 टक्क्यांनी वाढून 20.61 कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत 9.07 कोटी रुपयांची विक्री झाली होती. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये, कंपनीच्या आर्थिक वर्षात नफा 2.54 कोटी रुपयांवरून 9.19 कोटी रुपयांवर सातत्याने वाढला आहे.


मार्च 2019 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 8.05 कोटी रुपये होता, तर मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 5.87 कोटी रुपयांचा नफा झाला होता.


या जयपूर स्थित फर्म मोठ्या प्रमाणात मिनरल्स घेण्यात गुंतलेली आहे आणि एक स्टोन सप्लायर म्हणून काम करते. कंपनी फेरो अलॉयज, रॅमिंग मास, सिलिका रॅमिंग मिक्स आणि पिग आयरनची निर्मिती आणि निर्यात करते.