नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेच्या विकासाचा आलेख (Curve) उंचावला नाही, अशी टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चांगलेच फटकारले आहे. 'झी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी राहुल गांधी यांची चांगलीच खरडपट्टी काढली. राहुल गांधी म्हणतात की, देशाच्या विकासाचा आलेख (Curve) सपाट झाला आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा Curve सपाट झाला नाही. हे वक्तव्य पाहता त्यांचा 'वंशपरंपरागत' मेंदू सपाट (Flat curve) तर झाला नाही ना, अशी शंका वाटत असल्याचे नड्डा यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी


या मुलाखतीत जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. त्यांनी म्हटले की, देशात कोरोनाचे संकट असताना काँग्रेसने राजकारण सोडून काहीच केले नाही. गांधी कुटुंबीयांनी सुरुवातीला मजुरांची खिल्ली उडविली. त्यांनी लॉकडाऊनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता लॉकडाऊन उठवला तर तेच विचारतात की लॉकडाऊन इतक्या लवकर का उठवला? अनेक काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्रीही लॉकडाऊन हटवू नये, या मताचे आहेत.   गांधींनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केले. एकूणच काँग्रेसने निमित्त शोधून केवळ राजकारण केले, असे नड्डा यांनी म्हटले. दरम्यान, या मुलाखतीत नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच आगामी बिहार विधानसभा निवडणूक आणि भारत-चीन सीमाप्रश्नासंदर्भातही भाष्य केले. 


'महाराष्ट्रात फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले असते, पण आमच्याशी दगाफटका झाला'