'महाराष्ट्रात फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले असते, पण आमच्याशी दगाफटका झाला'

देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता

Updated: Jun 6, 2020, 07:27 AM IST
'महाराष्ट्रात फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले असते, पण आमच्याशी दगाफटका झाला' title=

मुंबई: महाराष्ट्रात आमचा पराभव झाला नाही तर केवळ दगाफटका झाल्यामुळे सत्तेपासून आम्हाला दूर राहावे लागले. अन्यथा देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. ते शुक्रवारी एका 'झी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी नड्डा यांना भाजपला महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षाकडून पराभव का स्वीकारावा लागला, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नड्डा यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच जनमताचा कौल होता. परंतु, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला. सत्तेसाठी आमच्यासोबत दगाफटका झाला, असे नड्डा यांनी म्हटले. 

शरद पवार आणि राऊतांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर रचला होता भाजपला धक्का द्यायचा प्लॅन

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप १०५ जिंकून सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमधील बोलणी फिस्कटली. त्यानंतर उभा महाराष्ट्र एका अभूतपूर्व राजकीय नाट्याचा साक्षीदार ठरला होता. अखेर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले होते. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते.

'दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी 'मिरची हवन' केलं होतं'