उरीत आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथल्या उरी सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय.
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथल्या उरी सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय.
या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर या ठिकाणी भारतीय जवान आणि पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन घेण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांकडून जवान आणि पोलिसांवर गोळीबार करण्यात आला.
भारतीय जवान आणि पोलिसांनीही या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. यांत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. या ठिकाणी चकमक अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.