नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटर उघडणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते पण सोमवारी रात्री हा निर्णय बदलण्यात आला आहे. काही ठराविक स्थानकांवर ठराविक वर्गासाठी तिकिट काऊंटर सुरु राहणार आहेत. ज्या ठिकाणाहून ट्रेन सुटतील आणि ज्या ठिकाणी पोहोचतील अशा ठिकाणी तिकिट काऊंटर खुली राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनरल प्रवासी या ठिकाणाहून तिकिट घेऊ शकणार नाही. विशेष वर्गासाठी तिकिट काऊंटर खुले राहील असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष रेल्वे मार्गावर खासदार, स्वातंत्र्य सैनिक यांना ही सुविधा असल्याचे रेल्वेने आपल्या ऑर्डरमध्ये सांगितले आहे. जनरल वर्गाच्या तिकिट या वेबसाईटद्वारेच मिळणार आहेत.


दिव्यांग वर्गासाठी ३एसीमध्ये दोन जागा आरक्षित असतील. सध्याच्या आणि माजी खासदारांसाठी १ एसीमध्ये दोन जागा, २ एसीमध्ये चार जागा आरक्षित असतील. रुग्ण, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तिकिटमध्ये सवलत घेऊ शकतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती सवलत नसेल. 


जेवण आणि पाणी घरुनच आणा; रेल्वेच्या प्रवाशांना सूचना


सर्व प्रवर्गातील तिकिट १२ ते १७ मे म्हणजे १ आठवड्यापर्यंत बुक करता येणार आहेत. काल रात्री सव्वा नऊ वाजल्यापासून ३० हजार पीएनआर जनरेट झाले आहेत. ५४ हजारहून अधिक प्रवाशांनी रिझर्वेशन केले आहे. 



रेल्वे प्रवासाठी देण्यात आलेल्या काही अटींमध्येच कन्फर्म ई तिकीट असणं अनिवार्य असेल. त्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय प्रवासाची सुरुवात करतेवेळी आणि प्रवासादरम्यानही सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन गेलं जाण्याची अट नमूद करण्यात आली आहे. निर्धारित स्थानकावर पोहोचल्यानंतर तेथे आरोग्य विभागाच्या आदेशांनुसार सर्व अटीचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असेल.  रेल्वेची कँटीन सेवा बंद असेल. शिवाय नेहमी देण्यात येणाऱ्या सुविधा उदा. ब्लँकेट, चादर, उशी या सुविधा पुरवण्यात येणार नाही. 


भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल


खास रेल्वे सेवांअंतर्गत या ट्रेन रुळांवर धावणार आहेत. नवी दिल्ली,ला जोडणाऱ्या दिब्रूगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदाबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवअनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू ताबी अशा स्थानकांवरुन या रेल्वे सोडण्यात येतील.