Mysterious Fire in Village: एका गावात गेल्या महिन्याभरापासून सतत आगीच्या घटना घडत होत्या. कोणाचे घर आगीत जळून खाक होत होते तर कोणाचा गोठा जळून भस्मसात होत होता. नेहमी नेहमी घडणाऱ्या या घटनांमुळं गावकरी वैतागले होते. अनेक उपाय शोधले तरी आगीच्या घटना कमी होत नव्हत्या. गावकऱ्यांनी सतत घडणाऱ्या आगीच्या घटनांचा संबंध भूत-प्रेतासोबत जोडून पाहिला. अखेर शेवटचा उपाय म्हणून गावकऱ्यांनी मांत्रिकाची मदतही घ्यायची ठरवली. पण त्यापूर्वीच आगीच्या घटनांचे गूढ समोर आले आणि सत्य ऐकून गावकरीही हैराण झाले. 


एका महिन्यात १२ घरांना आग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशमधील तिरुपतीमध्ये गेल्या एका महिन्यात १२ घरांमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या. ३० एप्रिल, १२ मे आणि १६ मे रोजी गावात आगीच्या घटना घडल्या होत्या. सततच्या आगीच्या घटनांमुळं गावकरी धास्तावले होते. या घटनांचे कारण शोधून काढण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करताच काही दिवसांतच आरोपी पकडला गेला. आरोपीला पाहताच गावकऱ्यांसह पोलिसही चक्रावले आहेत. 


 क्रेडिट कार्डनेही आता करा गुगल पे, कसं?, या सोप्या भाषेत समजून घ्या


पोलिसांनी एका १९ वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतलं. किर्ती अशी तिची ओळख पटली असून तिने स्वतःच्या घरासह गावातील इतर रहिवाशांच्या घराला आग लावली. यामुळं गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी यासंदर्भात किर्तीला जाब विचारताच तिने, ती इंटरमिडियएट परीक्षेत नापास झाली होती. त्याचबरोबर ती तिच्या आईच्या स्वभावामुळं वैतागली होती, असं कारण तिने दिलं आहे. 


समोर आलं धक्कादायक कारण


किर्तीला ते गाव सोडून दुसरीकडे राहायला जायचं होतं. मात्र, यासाठी तिचे कुटुंबीय तयार नव्हते. म्हणून तिने शेजाऱ्यांच्या घरांना आगी लावण्यास सुरुवात केली. घरातील कपडे, सुके गवत आणि अन्य वस्तू जमवून घरांना आग लावली. सतत घडत असलेल्या आगींच्या घटनांमुळं गावात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलिसांनी गावकऱ्यांच्या मनातील भीती दूर करत खऱ्या आरोपीला समोर आणलं आहे. 


आईपासून वैतागली होती


एका न्यूज एजन्सीनुसार, मुलगी तिच्या आईच्या स्वभावाला वैतागली होती. त्यातच ती इंटरमिडिएट फेल झाली होती. तिला त्या गावात राहायचं नव्हतं. कुटुंबीयांनी या गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरीत व्हावं, असं तिला वाटत होतं. म्हणूनच ती गावात भीतीचे वातावरण निर्माण करत होती. इतकंच नव्हे तर, एकदा तिने तिची आई झोपलेली असताना साडीला आग लावली. मात्र, सुदैवाने त्यांना गंभीर इजा झाली नाही. किर्तीने तिच्या घरातूनच ३० हजार रुपये चोरी केले होते. किर्तीने पोलिसांकडे आणखी एक खुलासा केला आहे, तिची एक मैत्रिणी तिच्याशी बोलत नव्हती त्याचाही तिला राग आला होता.


लहान मुलांना चॉकलेट देताय? त्याआधी ही बातमी वाचाच, 4 वर्षांच्या मुलाने आई- वडिलांच्या डोळ्यांदेखत जीव गमावला


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्तीने ज्या सामानांना आग लावली होती त्याची तपासणी करण्याकरिता लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी किर्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तिने चोरलेले ३० हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत.