गुगल पे युजर्संना आता क्रेडिट कार्डनेही पेमेंट करता येणार, कसं? सोप्या भाषेत समजून घ्या

RuPay Credit Card on UPI: गुगल पे आणि युपीआय पेमेंटमुळं आता ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे सोप्पे झाले आहे. गुगल पे ने आता ग्राहकांसाठी आणखी एक नवीन सेवा आणली आहे.

Updated: May 23, 2023, 04:34 PM IST
गुगल पे युजर्संना आता क्रेडिट कार्डनेही पेमेंट करता येणार, कसं? सोप्या भाषेत समजून घ्या title=
Google Pay now supports RuPay credit card

Rupay Credit Card: गुगल पे (Google Pay) आणि इतर डिजीटल मनी (Digital Payment) अॅपमुळं ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे सोप्पे झाले आहे. गुगल पेमुळं रोजचे व्यवहार करणे अधिक सोप्पे झाले आहे. किराणा सामान, लाइट बिल इथपासून ते अगदी पाणी-पुरीच्या आणि फळ-भाजींच्या दुकानातही गुगल पे करता येते. त्यामुळं आता खिशात कॅश घेऊन फिरण्याची गरज नाही. मात्र, गुगल पे व यूपीआयचा (UPI Payment) एक तोटा म्हणजे तुमच्या डेबिड कार्डच्या खात्यातूनच पैसे वजा होतात. जर तुमच्या डेबिड कार्डमध्ये पैसे नसतील तर तुम्ही गुगल-पेच्या सेवेचा फायदा घेऊ शकत नाही. मात्र, आता गुगल पेने भारतात एक नवीन सेवा लाँच केली आहे. 

क्रेडिट कार्डने करा युपीआय पेमेंट

गुगल पेचे वापरकर्ते आता क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही युपीआय पेमेंट करु शकतात. क्रेडिट कार्डच्या सहाय्यानेही लगेचच पेमेंट करता येणार आहे.  सध्या ही सेवा RuPay क्रेडिट कार्ज युजर्ससाठी आहे. भारतात व्हिसा, मास्टरकार्ड आणि रुपेहे डिजिटल कार्ड आहेत. त्यातील व्हिसा आणि मास्टरकार्ड या दोन्ही अमेरिकन कंपन्या आहेत. तर रुपे ही एक भारतीय कंपनी आहे. युजर्स आपले रुपे क्रेडिट कार्ड गुगल पेला लिंक करु शकतात. त्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करता येऊ शकेल.

२ हजारांची नोट बदली करण्याच्या नादात तुम्हाला खोट्या नोटा तर नाही मिळाल्या?; अशा ओळखा बनावट नोटा 

रुपे क्रेडिट कार्ड कसे लिंक करता येईल

रूप क्रेडिट कार्ड गुगल पेला लिंक करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. ज्याप्रकारे तुम्ही बँक अकाउंटसोबत डेबिड कार्ड लिंक करता त्याचप्रमाणेच क्रेडिट कार्डही लिंक करता येणार आहे. 

आजोबांनी नातवासाठी टॉफी घेतली, चॉकलेट खाताच नातवाने जीव गमावला, घडलं भयंकर

सोप्या टिप्स लक्षात ठेवा

सगळ्यात आधी तुम्हाला गुगल पे अॅप सुरू करावे लागले.

त्यानंतर सेटिग्स ऑप्शन निवडा

गुगल पेमध्ये जाऊन पेमेंट ऑप्शन सेटअप करा

पेमेंट ऑप्शनमध्ये अॅड रुपे क्रेडिट कार्ड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल

ऑप्शन सिलेक्ट केल्यावर क्रेडिट कार्डच्या शेवटी असलेले ६ अंक त्या नमूद करावे लागतील

त्याचबरोबर एक्सपायरी डेट आणि पिन नंबर सबमिट करा

त्यानंतर ओटीटी व्हेरिफिकेशनसाठी प्रोसेस करा

वरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रूपे क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट करु शकणार आहात.