मुंबई : गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांबरोबरच  सेन्सेक्सचीसुद्धा तारांबळ उडाली.


अनपेक्षित आघाडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकांनी संपूर्ण देशाचच राजकीय वातावरणच ढवळून निघालय. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावर कॉँग्रेसने अनपेक्षितपणे आघाडी घेतली आणि कॉँग्रेसचे नेते, भाजपचे नेते, मीडीया आणि शेअर बाजार सगळ्यांचीच पळापळ सुरु झाली. 


तासाभराचा राजकीय भूकंप


सुरूवातीला कॉँग्रेसने मतमोजणीत आघाडी घेतल्यामुळे तासाभरासाठी जणू राजकीय भूकंपच झाला. भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागतोय कि काय असंच वातावरण तयार झालं. त्याचाच एक परिणाम म्हणून शेअर बाजारातसुद्धा घसरण सुरु झाली. 


१००० अंकांचे हिंदोळे


व्यापारी आणि उद्योगपती यांच्या लाडक्या मोदींचा होमग्राउंडवरच पराभव होण्याच्या शक्यतेने शेअर बाजारातसुद्धा सकाळी मोठीच हालचाल झाली. सेन्सेक्स तब्बल ७०० अंकापर्यत खाली आला. त्यानंतर तासाभरात भाजपचंच सरकार येण्याची चिन्ह दिसू लागली आणि सेन्सेक्स पु्न्हा उसळी घेत ३३,७०० वर स्थिरावला. तीन तासात चढउतारांना सामोरं जात सेन्सेक्समध्ये तब्बल १००० अंकांची हालचाल झाली. गुजरातच्या निवडणुकांमुळे जणू सेन्सेक्सला सुद्धा थोड्या वेळासाठी का असेना मोठी सर्कस करावी लागली.