गरूडा कमांडो शहीद, तर सहा अतिरेक्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात सुरक्षा पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात सुरक्षा पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. तर हाजीन चकमकीत हवाई दलाचा एक गरूडा कमांडो शहीद झाला आहे, तर दोन जवान जखमी झालेत.
औवेद या दहशतवाद्यालाही कंठस्नान
अजूनही ही कारवाई सुरू आहे. या दहशतवाद्यांमध्ये औवेद या दहशतवाद्यालाही कंठस्नान घालण्यात आलंय. औवेद हा 26/11 चा मास्टरमाईंड असलेल्या झाकीर लखवीचा पुतण्या आहे. मागच्या काही महिन्यांपासून लष्कराने काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात मोहिम उघडलीय.
तर दोन जवान जखमी
श्रीनगरजवळील शुक्रवारीदेखील जाकूरा हजातबलमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलीय. तर दुसरीकडे काश्मीर खोऱ्यातील तणावपूर्ण वातावरण पाहता शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. तर संवेदनशील भागात पोलीस दल आणि सीआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.