Sonbhandar Caves Mystery: आपल्या देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे अनेक रहस्यही (Mysterious Places in India) आहेत. आपल्या भारतात बिहार राज्यात असेच एक ठिकाणं आहे जिथं अशीच अनेक रहस्य आहे. आपण सर्वांनीच लहानपणी गुहा आणि त्या गुह्यामध्ये असलेल्या खनिज्याबद्दल (Gold Reserve in Bihar) ऐकले असेलच. त्यातून आपल्यालाही अशी ठिकाणं कुठे असतील याबद्दलही कुतूहल वाटतं राहते. आपणही अशाप्रकारे कुठेतरी हा लपलेला खजिना शोधावा अशाही आपली मनोमनं इच्छा असते. राजगीरच्या (Rajgeer Caves) डोंगरात 2500 वर्षे येथे एक सोन्याचा खजिना लपल्याचे बोलले जाते. इतिकासकार (Historians) अद्यापही त्याचा शोध घेत आहेत. (sonbhandar caves mystery near rajgeer caves in bihar people says here is a gold reserve)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे सोनं लपवलं आहे म्हणून या जागेला सोन भंडार (Son Bhadhar) असं संबोधलं जातं. त्यातून येथील एक डोंगर हा दोन भागांमध्ये विभागला केला होता आणि त्याची रचना (Artchitechture) ही दोन खोल्यांमध्ये केली होती. येथील काही दगडांवर शंख लिपित काहीतरी कोरलं आहे. ज्याचीही चर्चा होते. 


काय आहे रहस्य? 


आम्ही ज्या रहस्यमय ठिकाणाबद्दल बोलत आहोत त्या ठिकाणाचं नावं आहे. बिहार येथील नालंदाचा सोन भंडार. राजगीर येथे हा सोनभंडार आहे. हर्यक वंशाचा संस्थापक बिंबिसाराच्या (King Binbisara) पत्नीनं या सोनभंडारात आपले सोनं लपवले असल्याचे बोलले जाते. तेव्हापासून अनेकांच्या नजरा या सोनभंडारावर खिळल्या आहेत. परंतु अद्यापही हा सोनभंडार कोणालाही सापडला नाहीये. येथे एक इंग्रजानंही तो शोधण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यालाही यात यश आलं नाही. त्यांनी तर त्यासाठी अनेक प्रयत्न केले असल्याचे बोलले जाते. बिंबासाराचा पुत्र अजातशत्रू त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला आणि त्यानंतर त्याचा म्हणजे अजातशत्रूचा खून अथवा आत्महत्या झाल्याचे कळते. त्याच्या मृत्यूनंतरही या खजिन्याचा तपास सुरू होता. 


कशी आहे रचना? 


सोनभंडाराच्या या गुहेत तुम्ही प्रवेश केलात तर तिथे 10.4 मीटर लांब आणि 5.2 मीटर रूंद खोली पाहायला मिळले. त्यातून या खोलीची उंची ही 1.5 मीटर आहे. ही खोली खजिन्याच्या रक्षणासाठी नेमलेल्या सैनिकांसाठी होती असं बोललं जातं. ही खोली बंद (Caves) आहे सोबतच ती दगडानं झाकलेली आहे. अनेक इतिहासकारांना यांच्या रचनेबद्दल शंका आहे. त्यामुळे अजूनही यावर प्रचंड संशोधन सूरू आहे. या भागाचा शोध लागला तेव्हा याविषयीच्याही अनेक काल्पनिक कथा पुढे आल्या होत्या. त्यामुळे त्यासंदर्भातील काही गोष्टी या अजूनही अज्ञात आहेत. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)