कोरियन दूतावासात Naatu Naatu चा फिवर, PM Modi यांनी अशी दिली रिअॅक्शन, पाहा Video
Naatu-Naatu Viral Video: दक्षिण कोरियाच्या दूतावासातील (South Korean embassy) कर्मचाऱ्यांचा प्रसिद्ध चित्रपटातील RRR चं प्रसिद्ध गाणं Naatu Naatu गातानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या क्लिपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधून घेतलंय.
Natu-Natu In South Korean Embassy Viral Video: काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या RRR चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याचा (Naatu Naatu) अनेकांवर फिवर चढला होता. अशातच आता दक्षिण कोरियाच्या दूतावासातील (South Korean embassy) कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ (Dance Video) व्हायरल होतोय. त्यात त्यांचा डान्स व्हिडिओ पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील खूश झाल्याचं पहायला मिळतंय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. (south korean embassy staff perform rrr song naatu naatu pm narendra modi share video goes viral)
नाटू नाटू या गाण्याची (Naatu Naatu Song) ख्याती जगभर ऐकू येत असल्याचं दिसतंय. गोल्डन ग्लोबनंतर आता या गाण्याला ऑस्कर 2023 साठीही नामांकन मिळालं आहे. तर भारतात सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणाच क्रेझ पहायला मिळतोय. भारतातील दक्षिण कोरियाचे दूतावासातील कर्मचारी देखील स्वत:ला रोखू शकले नाही.
Anand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज
भारतातील कोरियन दूतावासाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. राजदूत चांग जे-बाक देखील त्यांच्यासोबत डान्स करताना दिसले. 53 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दक्षिण कोरियाच्या दूतावासातील सर्व कर्मचारी झिंगलेले दिसत आहेत.
पाहा Video -
पंतप्रधान मोदी यांनी केलं कौतूक
भारतातील करियन दूतावासाने ज्यावेळी हे गाणं शेअर केलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ रिट्विट केलाय. चैतन्य जागं करणारा आणि मोहक करणारा हा तुमचा प्रयत्न असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत तब्बल 5 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे
पाकिस्तानी अभिनेत्री नाटू नाटूवर फिदा
दरम्यान,. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर नाटू नाटू गाण्यावर थिरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका लग्नसोहळ्यात नाटू नाटू डीजेवर लावण्यात आलं होतं. आरआरआर चित्रपटाला संपूर्ण सिनेविश्वातून उदंड प्रतिसाद मिळाला. रामचरण आणि जूनियर एनटीआर यांच्या डान्सवर संपूर्ण बॉलिवूड देखील फिदा झालं होतं.