Anand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

Anand Mahindra यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत. 

Updated: Feb 12, 2023, 12:05 PM IST
Anand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज title=

Anand Mahindra and Ram Charan Video : दिग्दर्शक राजामौली (S.S Rajamauli) यांच्या RRR या चित्रपटानं देशात नाही तर संपूर्ण जगातही धमाका केला आहे. चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान, चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं सगळ्यांना वेड लावले. या गाण्याची हूक स्टेपनं तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे. सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे आनंद महिंद्रा यांना 'नाटू नाटू' (Naatu Naatu Hook Step) या गाण्याची हूक स्टेप अभिनेता राम चरणनं (Ram Charan) स्वत: शिकवली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 16 सेकंदाच्या या व्हिडीओत राम चरण आणि आनंद महिंद्रा एकत्र दिसत आहेत. तर राम चरण हा आनंद महिंद्रा यांना नाटू नाटू या गाण्याची हूक स्टेप शिकवत होता. व्हिडीओ शेअर करत आनंद म्हणाला, "रेसच्या व्यतिरिक्त #HyderabadEPrix चा खरा बोनस राम चरणकडून नाटू नाटू स्टेप शिकणं होतं. खूप खूप अभिनंदन आणि ऑस्करसाठी खूप शुभेच्छा." (FIA Formula E World Championship) 

आनंद महिंद्रा यांच्या या व्हिडीओवर राम चरणनं देखील कमेंट केली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत राम चरण म्हणाला, "आनंद जी तुम्ही तर ही डान्स स्टेप माझ्यापेक्षा लवकर शिकली. तुम्हाला भेटून आनंद झाला. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आरआरआर टीमकडून आभार." हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राम चरणनं काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. तर त्यानं चप्पल देखील परिधान केलेली नाही. 

हेही वाचा : Kangana Ranaut : आलियावर संतापली कंगना रणौत, म्हणाली 'हा अगाऊपणा...'

RRR ने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास बनवला आहे. RRR ला ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले. तर, याआधी, RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं मोशन पिक्चरसाठी खिताब मिळाला. एवढंच नाही तर RRR या चित्रपटाला बेस्ट क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड फॉरेन लँग्वेज अवॉर्डही मिळाला आहे.