Stocks to Buy: आपल्याला नेहमीच आपण योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक (How to invest in stock) करावी आणि त्याप्रमाणे आपल्याला भरपूर रिटर्न्स (How can I get returns) मिळावेत यासाठी प्रयत्न करत असतो. हेच खरंच आहे की जर तुम्ही योग्य वेळी योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असू तर आपल्याला त्याचा चांगलाच परतावा मिळू शकतो. सध्या असेच काही स्टॉक्स तुम्ही विकत घेऊ शकता ज्याद्वारे तुम्हाला घसघशीत परतावा मिळू शकतो. अनेक ब्रोकरेजनी (Brokerage Recommendations on buying stocks) तसा सल्ला दिला आहे की या काही स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुम्हाला ज्या शेअरबद्दल सांगणार आहोत तो शेअर एका ऑटो कंपनीतला (Auto) आहे. या शेअरची किंमत 150 रूपये एवढी आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक असाल तर खालील काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. या कंपनीचे नाव आहे अशोक लेलँड (Ashok Leyland). तुम्हाला या शेअरमधून दमदार परतावा मिळू शकतो. 


धातूंच्या किमती कमी झाल्याचा फायदाही कंपनीला झाला आहे. कंपनी व्हॉल्यूमवर (Volume) लक्ष केंद्रित करत आहे यासाठी सवलती दिल्या जात आहेत. त्यातून कंपनीचा मार्केट शेअरही (Market Share) वाढतो आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल (Revenue) चांगल्या स्थितीत होता. 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


अशोक लेलँड कर्मशियल कार्सचे उत्पादन करते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत त्याचा बाजारातील हिस्सा हा 17.5 टक्के होता. यावर्षी त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या (Cars) वस्तूंचा हिस्सा 42 टक्के आहे तर ट्रकचा (Truck) 52 टक्के आणि बसेसचा (Buses) 6 टक्के आहे. 


काय आहे टार्गट प्राईझ? (Target Price) 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


ICICI सिक्युरिटीजने या कंपनीकरिता 185 रुपये टार्गेट प्राइस ठेवली आहे. मागणीत सुधारणा झाल्याने नफ्यात सुधारणा होईल, असं या अहवालात म्हटलं आहे. सप्टेंबर तिमाहीत EBITDA चा मार्जिन 6.5 टक्के होता जो या तिमाहीत 2.07 टक्क्यांनी जास्त आहे. सरकार यंदा इन्फ्रास्ट्रचरवर खूप खर्च करत असून गाड्यांच्या व्यापाराला चालना आणि मागणी आहे. त्यातून शाळा, महाविद्यालयं सुरू झाल्यानंतर मात्र सार्वजनिक गाड्यांचीही मागणी वाढणार आहे. ब्रोकरेज फर्म BNP PARIBAS ने या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. जुनी लक्ष्य किंमत 2.86 टक्क्यांवरून 180 रुपये करण्यात आली आहे. आज हा शेअर 3 टक्क्यांहून अधिक वाढताना दिसत आहे. हा शेअर 152 रुपयांच्या पातळीवर आहे. 52 आठवड्यांचा उच्चांक 169.45 रुपये आहे तर निम्न 93.20 रुपये आहे. या वर्षात आतापर्यंत स्टॉक 25 टक्क्यांनी वाढला आहे. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)