मुंबई : सिंगल मदर असणं कोणत्याही महिला ही अनेक आव्हानांना सामोरे जाते. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या या महिलेनं आपल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळल्या आहेत. चंचल शर्मा (Chanchal Sharma)असं या महिलेचं नाव आहे. एक स्त्री आपल्या मुलासाठी कोणत्या प्रकारचं जीवन जगते हे जाणून प्रत्येकजण तिला सलाम करतोय. चंचल शर्मा मुख्यतः पुरुष चालवतात त्या ई-रिक्षा चालवण्याचं काम करते.


आणखी वाचा : Malaika - Arbaaz च्या Divorce चं कारण आलं समोर..., एका सवयीनं घटस्फोट घडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेची कहाणी तुम्हाला चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा (Movie Script) कमी वाटणार नाही. उदरनिर्वाहासाठी एक महिला खांद्यावर मुलाला बांधून ई-रिक्षा (E-Rikshaw) चालवते. सकाळी साडेसहा वाजल्यापासून ती ई-रिक्षा चालवते आणि प्रवाशांना त्यांच्या जागी सोडते. दुपारी मुलाला आंघोळ घालते आणि ती पुन्हा ई-रिक्षा चालवायला लागते.


आणखी वाचा : तो अचानक आर्चीच्या घरी आला...; रिंकु राजगुरुनं सांगितला 'तो' भयानक अनुभव


चंचल नोएडा सेक्टर 62 ते नोएडा सेक्टर 59 दरम्यान ई-रिक्षा चालवते. तिला ई- रिक्षा चालवताना पाहूण तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे जवळजवळ अशक्य आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मुलाच्या जन्मानंतर केवळ अडीच महिन्यातच चंचल नोकरीच्या शोधात निघाली होती. या दरम्यान या महिलेला ई-रिक्षा विकत घ्यावी लागली, मुलाला कामाचा वेळेत कुणाकडे सोडण्याची व्यवस्था होऊ शकली नाही, मग काय कराचं असा प्रश्न समोर येताच चंचलनं तिच्या मुलालासोबत घेत रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. (Super Mom Uttar Pradesh Noida Mother With Her Baby Drives E Rikshaw For Earning Monet Inspires )


आणखी वाचा : नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!



आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या 'या' ड्रेसच्या किंमतीत, तुमचं संपूर्ण कुटूंब करु शकेल Europe Trip


चंचल तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे आणि तिच्या आईसोबत एका खोलीत राहते. तिची आईही हातगाडीवर कांदा विकते. दिवसभराच्या 700 रुपयांच्या कमाईपैकी चंचलच्या कमाईतील 300 रुपये हे कर्ज देणाऱ्या खासगी एजन्सीला जातात. चंचल आपल्या मुलाला चांगलं आयुष्य देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.