मुंबई : माणूस असो वा प्राणी असो वा पक्षी, प्रत्येकाला स्वतःचं घर हवं असतं. कोणताही जीव दिवसभर कुठेही फिरू शकतो, पण संध्याकाळनंतर त्याला त्याच्या घराची गरज भासू लागते. अशा परिस्थितीत तुमच्या संमतीशिवाय हे घर कोणी तोडलं तर तुम्हाला कसं वाटेल. तुमचं घर तुटलेलं दिसलं तर तुम्ही नक्कीच तुटून पडाल आणि तक्रार कराल. पण ही घटना पक्ष्यांसोबत झाली तर ते काय करणार? ते काहीकी करू शकत नाहीत. 


आणखी वाचा : छोटे कपडे परिधान करत बाप्पाचं दर्शन करणं अभिनेत्रीला पडलं महागात, सोशल मीडियावर होते ट्रोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान (IFS Praveen Kaswan) यांनी असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही अश्रू अनावर होतील. प्रवीण कासवान यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ कुठला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. पण हा व्हिडिओ नक्कीच प्रत्येक मानसाला त्याच्या कृतींबद्दल विचार करायला भाग पाडतो. विकासाच्या नावाखाली पशू-पक्ष्यांची घरे हिसकावून घेत आहेत.


आणखी वाचा : शाहरुख खान साकारणार वानराची भूमिका? हीरो नाही म्हणून...



आणखी वाचा : Sussanne Khan च्या ब्रालेट लूकवर Boyfriend अर्सलन गोनी फिदा, पण...


जेसीबी मशीनद्वारे मोठं झाड तोडल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ते झाड पडणार इतक्यात त्यावर बसलेले अनेक पक्षी उडून जातात. तर काही पक्षी हे त्या झाडावरून तितक्या वेगानं उडू शकले नाहीत आणि ते झाड रस्त्यावर जोरात पडताच त्यावर असलेले पक्षी जोरात आदळतात आणि त्यांचा मृत्यु होतो. त्या पक्षांसोबत त्यांची पल्लही रस्त्यावर मृत्युमुखी पडतात. 


आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर


रस्त्यावर विखुरलेले पक्ष्यांचे शव पाहून प्रत्येकजण जेसीबी मशीनवाल्याला चांगलं-वाईट सुनवत असल्याचे दिसून येते. पण मेलेल्या पक्ष्यांचे काहीही होऊ शकत नाही. रस्त्यावर पडलेल्या पक्षांचा मृतदेह पाहून तेथे उपस्थित असलेले लोकांना अश्रू अनावर झाले. तर हवेत उडत असलेले पक्षी त्यांच्या पिल्लांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असले तरी देखील ते गाड्यांची गर्दी आणि आवाजामुळे तेथे जाण्याचे धाडस करत नाहीत. 


KBC 14 : 75 लाख रुपयांच्या या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला शो, तुम्हाला माहितीये का उत्तर?


प्रवीण कासवान यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनं लोकांना धक्का बसला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला साडेपाच लाख व्ह्यूज मिळाले असून सुमारे 7500 लोकांनी तो रिट्विट केला आहे. जवळपास 1100 लोकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षी मारण्यासाठी जबाबदार असलेल्या जेसीबी चालकावर आणि त्याला कामावर ठेवणाऱ्या मालकावर कडक कारवाई करावी, असा संताप नेटकरी व्यक्त करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'जर आपण इतर सजीवांप्रती माणुसकी दाखवू शकत नसाल तर आपल्याला माणूस म्हणवण्याचा अधिकार नाही.'