Trending Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण स्क्रोल करत असतो तेव्हातेव्हा कायमच काही नव्या गोष्टी नजरेस पडता. एखाद्या कलाकार जोडीच्या नात्यात आलेला दुरावा, कोणामध्ये बहरणारं प्रेम, नवे चित्रपट, नव्या घोषणा या साऱ्याच्या पलिकडे जाऊन आता सोशल मीडियावर बहुविध विषय अगदी सहजपणे पाहता येतातत. जगाच्या पाठीवर कुठं काय सुरुये हे उत्तमरित्या सादर करणाऱ्या मंडळींची संख्या झपाट्यानं वाढल्यामुळं आता ही सोशल मीडियाच अनेकांसाठी माहितीचा स्त्रोत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त माहिती किंवा मनोरंजनापुरताच मर्यादित न राहता या माध्यमातून अनेकदा काही अशा गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला भानावर आणतात. अनेकदा आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अनेकांच्याच Feed मध्ये दिसला. जो पाहताना नकळतच भावना दाटून आल्या, तर काहीजण भारावून गेले. 


असं काय आहे या व्हिडीओमध्ये? 


कलव छाब्रा नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) युजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो काही मुलांसोबत पंचताराकिक हॉटेलमध्ये Dinner करताना दिसतोय. आता तुम्ही म्हणाल त्यात कौतुकाचं काय? तर, कवलसोबत दिसणारी ही मुलं त्याच्या ओळखीची नव्हती, तर ही होती रस्त्यावर, वाहतूक कोंडीमध्ये कार स्वच्छ करण्यासाठी येणारी अनोळखी मुलं. 


हेसुद्धा पाहा : PHOTOS: इतकी थंडी की तलावासह मासेही गोठले, मग -56 °C मध्ये माणसं जगतात तरी कसे?


चार पैशांसाठी, पोट भरण्यासाठी, तर कोणी मोठं होऊन डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी काबाडकष्ट करून बालपण बाजुला सारून मेहनत करणारी ही मुलं कवलच्या कारपाशी आली आणि त्यांनी कार पुसण्यास सुरुवात केली. तितक्यातच त्यानं कारची खिडकी उघडून त्यांच्याशी संवाद साधला असता. ज्यानंतर कवलनं तिथं असणाऱ्या इतरही मुलांना आपल्या कारमध्ये बसण्यास सांगितलं. 



अनोखळी व्यक्तीनं कारमध्ये बसायला सांगितल्याचं पाहून त्या मुलांनी कुतूहलानं, 'आपण कुठे चाललोय?' असा प्रश्न त्यांना केला. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काही क्षणांतच मिळालं आणि ही मुलं आश्चर्यचकित झाली. कारण, कवलनं त्यांना एका मोठ्या आलिशान हॉटेलात जेवणासाठी नेलं होतं. तिथं या मुलांच्या उत्साहानं परमोच्च शिखर गाठलं. त्यांच्यापैकी कोणी, आजुबाजूला कुतूहलानं पाहताना दिसलं, तर कोणी तिथं मिळणाऱ्या पदार्थांना चवीनं खाल्लं. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना कवलही भारावला. त्याचा हा अनुभव फक्त त्याच्यासाठीच भावनांच्या परवणीचा नव्हता तर, सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला, त्यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली.