PHOTOS: इतकी थंडी की तलावासह मासेही गोठले, मग -56 °C मध्ये माणसं जगतात तरी कसे?

Siberia News: जगाच्या पाठीवर एक असंही ठिकाण आहे जिथं इतकी थंडी पडलीये तुम्हाला पाहूनच धडकी भरेल. आता हे ठिकाण नेमकं कुठंय आणि तुम्ही तिथं कधी पोहोचू शकता हेसुद्धा पाहूनच घ्या. 

Dec 07, 2023, 16:11 PM IST

Siberia Temprature -56 : सध्या जगाच्या बहुतांश भागांमध्ये हिवाळा सुरु झाला असून, काही भागांमध्ये तर हिमवृष्टीही सुरु झाली आहे. इथं भारताच्या उत्तरेकडे होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला हुडहुडी भरली असेल तर थांबा.... 

1/7

सायबेरिया

Siberia Tempretaure reaches minus 56 Celsius See chilling Photos

रशियातील सायबेरिया प्रांतामध्ये यंदाच्या वर्षीसुद्धा तापमान उणे 50 अंशांहूनही कमी झालं आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळं इथं नागरिकांना दैनंदिन कामांमध्येसुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

2/7

तापमान उणे 56 अंशांपर्यंत

Siberia Tempretaure reaches minus 56 Celsius See chilling Photos

सायबेरियामध्ये सध्याच्या घडीला तापमान उणे 56 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. तर, रशियामध्ये आलेल्या हिमवादळामुळं मॉस्कोवरही बर्फाची चादर अच्छादली आहे.   

3/7

निच्चांकी तापमान

Siberia Tempretaure reaches minus 56 Celsius See chilling Photos

हवामान विभागाच्या माहितीनुसार सायबेरियाच्या उत्तर पूर्वेला असणाऱ्या आणि जगातील सर्वात थंड शहरांपैकी एक असणाऱ्या याकुत्स्क मध्ये हे निच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं. 

4/7

गारठा उणे 60 अंशांइतका

Siberia Tempretaure reaches minus 56 Celsius See chilling Photos

हवा आणि आर्द्रतेचं प्रमाण पाहता तापमानातील गारठा उणे 60 अंशांइतका भासत असल्यामुळं इथं प्रत्येक गोष्ट गोठण्यास सुरुवात झाली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही परिस्थिती असल्यामुळं आता भविष्यात थंडीचा कडाका आणखी किती वाढणाच याचीच चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

5/7

याकुत्स्क

Siberia Tempretaure reaches minus 56 Celsius See chilling Photos

याकुत्स्कमध्ये तापमानानं इतकी निच्चांकी नोंद केली की, इथं तलावच नव्हे त्यात असणारे मासेही बाहेर काढताच गोठले. 3 डिसेंबरला रशियातील बहुतांश प्रांतांमध्ये सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद करण्यात आली. 

6/7

दृश्यमानता कमालीची कमी

Siberia Tempretaure reaches minus 56 Celsius See chilling Photos

कडाक्याच्या थंडीमुळं इथं पापण्यांवर असणारा पाण्याचा अँशही गोठला आहे. तर, सायबेरियामध्ये दृश्यमानता कमालीची कमी झाल्यामुळं वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले आहेत.   

7/7

तुम्ही इथं भेट देणार का?

Siberia Tempretaure reaches minus 56 Celsius See chilling Photos

जगभ्रमंती करु इच्छिणाऱ्या अनेकांसाठी बर्फानं अच्छादलेला हा प्रदेश कायमच कुतूहलाचा विषय ठरतो. काय मग, थंडीचा मारा सोसायला तुम्ही इथं भेट देणार का?