UIDAI Recruitment 2024: यूआयडीएआयमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आधारमध्ये काम करायचे असेल तर पटापट अर्ज करावा लागेल. आधारच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 


रिक्त जागांचा तपशील 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूआयडीएआय अंतर्गत सेक्शन ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट टेक्निकल ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यात सेक्शन ऑफिसरची 1 जागा, टेक्निकल ऑफिसरच्या 2 जागा, असिस्टंट सेक्शन ऑफिसरची1 जागा, असिस्टंट टेक्निकल ऑफिसरच्या 3 जागा भरल्या जाणार आहेत. 


पगार


सेक्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 47 हजार 600 ते 1 लाख 51 हजार 100 रुपये इतका पगार मिळेल. टेक्निकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 47 हजार 600 रुपये ते 1 लाख 51 हजार 100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपयेापर्यंत पगार दिला जाईल. तर असिस्टंट टेक्निकल ऑफिसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे. 


Mumbai Job: मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी; इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज


असा करा अर्ज 


या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन दिलेला फॉर्म भरावा. आवश्यक डॉक्यूमेंट्स जोडावे. उमेदवारांनी आपले अर्ज मानव संसाधन, यूआयडीएआय, डेटा सेंटर, औद्योगिकी केंद्र, कार्यालय परिसर प्लॉट नंबर-1, सेक्टर एम2, आयएमटी मानेसर (गुरुग्राम)- 122050 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 


अर्जाची शेवटची तारीख 


7 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्या.


RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज