RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

Jul 21, 2024, 07:40 AM IST
1/9

RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

RBI Bharti 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर रिझर्व्ह बँकेच्या भरतीसाठी नक्की अर्ज करा.येथे तुम्हाला चांगल्या पदाची सरकारी नोकरी मिळू शकते. 

2/9

ग्रेड B अधिकारी पदासाठी भरती

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे दरवर्षी विविध विभागांमध्ये ग्रेड B अधिकारी पदासाठी भरती परीक्षा घेतली जाते. यावर्षी होणाऱ्या परीक्षेसाठी आरबीआयने नोटिफिकेशन जारी केले आहे.

3/9

94 पदांवर भरती

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, यावर्षी परीक्षेद्वारे एकूण 94 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

4/9

24 जुलैपासून अर्ज प्रक्रिया

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसर भरतीसाठी परीक्षा घेतली जाईल. यासाठी 24 जुलैपासून अर्ज प्रक्रियाही सुरू होणार आहे.

5/9

वेबसाईटवर करा अर्ज

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

ग्रेड बी ऑफिसर भरती परीक्षा 2024 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना RBI ची अधिकृत वेबसाइट chances.rbi.org.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.

6/9

अर्ज शुल्क

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

ग्रेड बी अधिकारी भरती परीक्षा 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 850 रुपये (जीएसटी अतिरिक्त) विहित शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी उमेदवारांना 100 रुपये (जीएसटी अतिरिक्त) शुल्क भरावे लागेल.

7/9

बॅचलर पदवी

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

आरबीआय ग्रेड बी ऑफिसर (सामान्य) भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 60% गुणांसह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. 

8/9

पदव्युत्तर पदवी

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

ग्रेड बी ऑफिसर (DEPR) साठी अर्थशास्त्र किंवा संबंधित विषयात किमान 55% गुणांसह मास्टर डिग्री असणे गरजेचे आहे. ग्रेड बी ऑफिसर (DSIM) पदासाठी अर्जदाराने सांख्यिकी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

9/9

वयोमर्यादा

RBI Grade B Officer Recruitment Exam 2024 Job Marathi News

या रिक्त पदासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 30 निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल याची नोंद घ्या.