Budget 2023: बजेटनंतर काय असेल शेअर मार्कटची स्थिती, गुंतवणुकदारांवरही होईल परिणाम
Budget 2023 Updates: मागच्या वर्षीही बजेटच्या नंतर आणि आधी शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल यावरही महत्त्वपुर्ण चर्चा झाली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटकडे अधिक लागलेले होते.
Budget 2023 Live Updates: सध्या सगळीकडेच बजेटचं वातावरण आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लवकरच केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष आता बजेटकडे (Budget News) लागले आहे. येत्या बजेटमधून लोकांना काय मिळणार याकडेही अनेकांच्या अपेक्षा आहेत. खासकरून शेअर मार्केटच्या चढउतारावरून बजेटनंतर शेअर मार्केटची (Share Market after Budget) काय परिस्थिती असेल यावरही अनेकांनी आपले लक्ष वेधले आहेत. गुंतवणूकदारांनी (Investors) यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याबद्दल आता सगळीकडेच चर्चा सुरू झाली आहे. त्यातून मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही याचा काही मोठा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळेल की नाही याकडेही सर्वांचेच प्राधान्यानं लक्ष लागले आहे.
मागच्या वर्षीही बजेटच्या नंतर आणि आधी शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल यावरही महत्त्वपुर्ण चर्चा झाली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटकडे अधिक लागलेले होते. 2023-24 च्या बजेटच्या वेळीही सेन्सेक्स हा 850 अंकांनी वाढला होता. त्यातून निफ्टी हा 237 या अंकांवरती होता. त्यातून त्या वेळी आता शेअर मार्केटमध्ये मोठी चढाव पाहायला मिळेल या दृष्टीने सर्व तज्ञांनाच सकारात्मकता दिसत होती. परंतु मागच्या वर्षी बजेटनंतरच युक्रेन-रशिया युद्धानं (Ukraine - Russia War) डोकं वर काढले आणि त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अचानक बरेच बदल पाहायला मिळाले. या युद्धाचा प्रामुख्यानं सप्लाय चेनवर खूप मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला. जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा खूप मोठी परिणाम झाला. त्याचा परिणाम मुख्यत्वे शेअर मार्केटवर झाला.
मागच्या आणि येत्या बजेटच्या दृष्टीनं शेअर मार्कटमध्ये काय फरक राहू शकतो?
सेन्सेक्स (Sensex) 848 अंकाच्या चढावावर जाऊन तो 58,862.57 वरती बंद झाला आणि निफ्टी 237 अंकांवरून जात तेजी दाखवत 17,577 या अंकावरतीच बंद झाला. बजेट जेव्हा 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील तेव्हा शेअर मार्केटची स्थिती काय असेल यावर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आता दोन दिवसांनंतर बजेटची काय स्थिती असेल हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु येत्या शुक्रवारचे जर का आकाडे पाहिले तर सेन्सेक्स 60,261 वर बंद झाला आणि निफ्टी (Nifty) 17,957 वर बंद झाला. मार्केट रिटर्न्स यादरम्यान 2.5 टक्के होते त्यामुळे नाही म्हटलं तरी यामुळे बाजारात घट निर्माण झाली आहे.
आता या आकाड्यानुसार जरा का हिशोब करायचा झाला तर सेन्सेक्समध्ये 2 हजारांच्या आकड्यांनी तर फरक आहे आणि त्यामुळे सेन्सेक्स हा खूप घसरतो आहे. त्यातून निफ्टीत फारसा काही बदल झालेला नाही.