VIDEO: मगरीचा जबडा बांधला अन् खांद्यावर घेऊन पळत सुटला तरुण; आफ्रिका नव्हे, भारतातली घटना
उत्तर प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरुण मगरीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहेत.
viral news : 'खरतों को खिलाडी' हा छोट्या पडद्यावरील रियालिटी शो चांगलाचा लोकप्रिय आहे. या शो मध्ये स्पर्धक विविध प्रकारचे खरतनाक स्टंट करतात. मात्र, स्टंट करताना स्पर्धकांच्या सुरक्षच्या अनुषंगाने चोख उपाययोदना केलेल्या असतात. दोघा तरुणांनी या शो मध्ये केल्या जाणाऱ्या खरतनाक स्टंट पेक्षा डेंजर स्टंट प्रत्यक्षात केला आहे. एका मगरीचे तोंड दोरीने बांधून मगर खांद्यावर घेत हा तरुण 300 मीटर चालत गेला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जिवंत मगर खांद्यावर घेवून चालत जाणाऱ्या या तरुणाचे धाडस पाहून धडकी भरत आहे. मगरीला खांद्यावर घेवून जाणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अशा प्रकारे मगरीला खांद्यावरुन नेणे धोकादायक ठरु शकते.
उत्तर प्रदेशातील हा व्हिडिओ ललितपूर कोतवाली परिसरातील हा व्हिडिो आहे. अनोरा गावातील रहिवासी असलेल्या आझादसिंग ठाकूर यांच्या तलावात ही मगर सापडली. तलावात मगर दिसल्यानंतर गावात एकच खळबल उडाली. वन विभागाला या बाबत माहिती देण्यात आली. वन विभागाचे पथक ठाकूर यांच्या तलावाजवळ दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला पकडून सुरक्षित स्थळी सोडले.
मगर खांद्यावरुन नेणारे तरुण आहेत तरी कोण?
सोहन राईकवार आणि संजू राईकवार अशी व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांची नावे आहेत. मगरीची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने राजवाडा गावातील सोहन राईकवार आणि संजू राईकवार आणि ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला पकडले आणि तिचे तोंड दोरीने बांधले. ज्या तलावात ही मगर सापडली तेथे वाहन पोहचू शकत नव्हते. यामुळे वाहना पर्यंत ही मगर कशी घेवून जायची असा प्रश्न वन विभागाच्या पथकाला पडला. सोहन आणि संजू यांनी मगर खांद्यावर घेतली. यानंतर तब्बल 300 मीटर पायपीट करत ते मगरीला घेवून वाहनापर्यंत पोहचले. तलावापासून वाहन 300 मीटर दूर थांबवण्यात आले होते. संजू आणि सोहन यांनी मगरीला खांद्यावर उचलून वाहनापर्यंत आणले. यानंतर याच वाहनातून मगरीला सजनम धरण परिसरात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
तरुणांच्या धाडसाचे कौतुक
संजू आणि सोहन यांना मगरीला खांद्यावर घेवून जाताना पाहून ग्रामस्थ अचंबित झाले. ग्रामस्थांनी संजू आणि सोहन यांचा मगर खांद्यावर घेवून चालत असतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मिडियावर शेअर केला. संजू आणि सोहन यांचा मगरीला खांद्यावर घेवून जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ग्रामस्थांनी तरुणांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.