नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. पण या पाचव्या टप्प्यात अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या लॉकडाऊनला अनलॉक 1.0 नाव देण्यात आलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अधिकाधिक व्यवहार, कामकाज सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही राज्यांमध्ये शनिवार आणि रविवारी लॉकडाऊनचं पूर्णपणे पालन करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा आणि उत्तराखंड सरकारने याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या राज्यांनी शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशा सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जून महिन्यात प्रत्येक शनिवार आणि रविवारी 'विकेंड शटडाऊन'चं पालन केलं जाणार आहे.



कोरोना लॉकडाऊनचा 'मॅगी'वर असा झाला परिणाम


 


11 जिल्ह्यांमध्ये 6-7, 13-14, 20-21 आणि 27-28 जून रोजी सर्व सरकारी कार्यालये पूर्णपणे बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना आपलं ओळखपत्र ठेवणं गरजेचं असणार आहे. तसंच अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडल्यास, अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


मास्क घालण्याबाबत WHOच्या गाईडलाईन्समध्ये बदल


ओडिशामध्ये सर्व शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. 


उत्तराखंड सरकारनेही शनिवार आणि रविवार या विकेंड दिवशी राज्याची राजधानी देहरादून पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच विकेंड लॉकडाऊन दिवशी सूट देण्यात आली आहे.