मुंबई : पहिल्यांदा पालक झाल्यावर लोकांना अनेक गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे पालकांकडून अनेक चुका होतात. पहिल्यांदा आई झाल्यावर स्त्रियांना माहित नसते की, त्यांनी आपल्या बाळाला स्तनपान करणं कधी थांबवायचे किंवा कोणत्या वयात त्यांना स्वतंत्र खोली द्यायला हवी. या सर्वांसोबत, आणखी एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि जो बऱ्याच पालकांना माहित नसतो, तो म्हणजे लहान बाळांना आंघोळ घालणं कधी थांबवलं पाहिजे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसचे आपल्या देशात अनेक पालक त्यांच्यासोबत लहान मुलांना आंघोळ घालतात. हे सामान्य आहे परंतु काही काळानंतर आपण हे करणे थांबवले देखील पाहिजे.


वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर अंघोळ घालताना मुलांना त्यात काहीही वाटत नसेल तर ठिक आहे. परंतु जर मुलांना हे असे आवडत नसेल तर ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून समजते, आपल्याला त्यांच्या खूना ओळखता आल्या पाहिजेत. तसेच मुलं जेव्हा लाजायला लागतात तेव्हा पालकांनी समजून जावं की, यामुळे त्यांच्या मुलाला त्रास होत आहे किंवा त्याला ते आवडत नाही आहे. तसे मुलं थोडी मोठी होईपर्यंत त्यांच्या सोबत अंघोळ करणं देखील पालकांनी थांबवायला हवं.


योग्य वयात मुलांना प्रायव्हसीची संकल्पना समजावून सांगितली पाहिजे. मुलांना माहित असले पाहिजे की, काही गोष्टी खाजगी आहेत.


मुलाकडून मिळणारे सिग्नल समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मुलाला त्याच्या पालकांसमोर कपडे काढायला लाज वाटते, तेव्हा पालकांनी त्याला स्वतः आंघोळ घालणे बंद केले पाहिजे. काही मुलींना त्यांच्या आईसमोर नग्न होण्यात काही अडचण येत नाही पण ते वडिलांसमोर संकोचतात. 


काही वेळेला ही मुले त्यांच्या प्रायव्हेट पार्ट बद्दल प्रश्न विचारू लागतात. त्याच वेळी, मुले त्यांच्या पालकांच्या शरीराच्या अवयवांबद्दल देखील विचारु लागतात. मुले त्यांच्या आईला विचारू शकतात की त्यांचे शरीर वेगळे का आहे. त्यावेळाला तुम्ही त्यांना अंघोळ घालणे किंवा त्यांच्यासोबत अंघोळ करणे थांबवले पाहिजे.


जेव्हा तुमचं मुल शाळेत जाऊ लागतो, तेव्हा त्याला वेगवेगळ्या जीवनशैलीतील मुलं भेटतात. जेव्हा इतर मुलांमध्ये त्यांच्या आईवडिलांसोबत आंघोळ करण्याची गोष्टं निघते तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू लागतात. अशी परिस्थिती कशी टाळावी हे मुलांना तुम्ही शिकवायला हवे.
मुलांना त्याच्या शरीराच्या अवयवांबद्दल सांगा आणि त्यांना समजावून सांगा की कोणत्याही अज्ञात व्यक्तीने या भागांना स्पर्श करू नये असे करणे चुकीचे आहे याची त्यांना जाणीव करुन द्या.


प्रत्येक कुटुंब वेगळे आहे. त्यांच्या काही पद्धती देखील वेगळ्या आहेत. मुलासाठी काय योग्य आहे हे निवडण्याची जबाबदारी पालकांची आहे. कोणताही निर्णय घेताना सर्व सदस्यांची संमती असावी. काही कुटुंबांमध्ये, पालक मुलाबरोबर आंघोळ करत नाहीत आणि ही पद्धत देखील त्यांच्यासाठी योग्य असल्याचे सिद्ध होते.