Bank Cheque Rule: बँकेकडून यूपीआय, नेट बँकिग अशा सुविधा दिल्यानंतरही आजही मोठ्या प्रमाणात चेकचा वापर केला जातो. मोठ्या व्यवहारांसाठी व पारदर्शकता टिकून राहण्यासाठी चेकचा वापर करण्यात येतो. एखाद्याला मोठी रक्कम देत असताना किंवा कोणाकडून रक्कम येत असेल तर चेकनेच हे व्यवहार केले जातात. पण चेक लिहित असताना रक्कम लिहून झाल्यानंतर त्याच्या शेवटी Only असे का लिहितात. यामागचा नेमका अर्थ काय?, हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेकमध्ये शब्दात लिहलेल्या रक्कमेनंतर Only किंवा फक्त असं लिहलं जाते. तुम्हीदेखील चेक भरत असताना असं लिहित असालच. मात्र, आपण हे असं का लिहतो हे जाणून घ्या. खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने शब्दात रक्कम लिहिल्यानंतर Only किंवा फक्त लिहिले जाते. जेणेकरुन तुमच्या चेकची सिक्युरिटी वाढेल आणि हा शब्द तुमची फसवणूक होण्यापासून रोखतो. Only किंवा फक्त लिहल्यामुळं हा चेक तुम्ही ज्या व्यक्तीला देत आहात ती त्याचेकवरील रक्कम वाढवू शकत नाही. व तुमच्या खात्यातून जास्तीची रक्कम काढू शकत नाही. 


समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपयांचा चेक द्यायचा आहे आणि शब्दांत रक्कम लिहित असताना त्यावर Only लिहायला विसरलात तर या रक्कमेच्या पुढे ती व्यक्ती आणखी रक्कम वाढवू शकते. कारण Only लिहिलं नसल्याने फसवणूक होण्याची शक्यता असते. तसंच, आकड्यात रक्कम लिहित असताना त्याच्यापुढे / लिहायला विसरु नका. 


चेकवर Only न लिहल्यामुळं बँकेत तुमचा चेक वैध ठरणार नाही असे काही नसते किंवा तुमचा चेक बाउन्सही होत नाही. फक्त तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चेकपुढे Only किंवा फक्त लिहिण्यास सांगितले जाते. अर्थात Only लिहावे यासाठी बँक कोणावरही जबरदस्ती करत नाही. फक्त चेकवर Only लिहिण्यामागील कारण म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहणे. एवढाच उद्देश्य असतो.