भारतीय जेवणात गरम मसाल्यांना फार महत्व असते. जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकजण विविध गरम मसाल्यांचा वापर करतात. मात्र आयुर्वेदात काही गरम मसाल्यांचा वापर आजारांवर औषध म्हणून सुद्धा केला जातो.  असाच एक मसाला म्हणजे 'चक्रफुल'. चक्रफुलची चव ही किंचित गोड आणि तिखट असते. तेव्हा चक्रफुल वापरण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेऊयात. 


चक्रफुलामुळे आरोग्याला मिळणारे फायदे :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. स्टार ऐनिस म्हणजेच चक्रफुलाचे सेवन पचनक्रियेसाठी उत्तम ठरते. हे पोटाच्या समस्या जसं की गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादींपासून सुटका मिळते. चक्रफुलात असलेल्या अँटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे पोटदुखीपासून आराम मिळण्यास मदत मिळते. 


2. चक्रफुलमध्ये मजबूत अँटी ऑक्सिडंट्स असतात जे शरीराला हानिकारक फ्री रेडिकल्स पासून वाचवतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. 


3. चक्रफुलमध्ये व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषकतत्व असतात ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. यामुळे सर्दी- खोकला सारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. 


हेही वाचा : बोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय, एकदा वापरून बघाच


 


4. चक्रफुल सेवन केल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि शरीरातील पेशींना संरक्षण मिळते.


5. चक्रफुलमध्ये व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषकतत्व असतात ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. यामुळे सर्दी- खोकला सारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. 


6. चक्रफुलमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यास मदत करतात. हा मसाला नैसर्गिकरित्या संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित लक्षणे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. 


7. अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान खूप त्रास होतो. चक्रफुलमध्ये एस्ट्रीगोल नावाचा घटक असतो ज्यामुळे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत मिळते, ज्यामुळे महिलांना पाळीच्या दिवसांमध्ये कमी त्रास होतो. 


चक्रफुलचा वापर कसा करावा?


चक्रफुलचे सेवन तुम्ही वेगेवेगळ्या पद्धतीने करू शकता. चहा, सूप किंवा करीमध्ये टाकून सुद्धा तुम्ही याचे सेवन करू शकता. किंवा दररोज सकाळी एक चक्रफुल पाण्यात उकळवून त्याचे सेवन केल्याने त्याचे परिणाम लवकर जाणवतात.