Gurugram Police Fined Badshah: आपल्या रॅपमुळे प्रसिद्ध असलेला रॅपर बादशाह वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने चर्चेत आला आहे. नुकतेच बादशाहला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरावा लागला. तो गुरुग्रामच्या एअरिया मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टसाठी जात होता. लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नात त्याने मोठी चूक करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. काय आहे हे प्रकरण समजून घेऊया.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रविवारी संध्याकाळी एयरिया मॉलमध्ये गायक करण औजला (Karan Aujla) यांचा कॉन्सर्ट होता. सिंगर बादशाह यामध्ये सहभागी होण्यासाठी निघाला होता.  कॉन्सर्टमध्ये लवकर पोहचण्याच्या नादात त्यांने आपली थार चुकीच्या रस्त्यावरुन चालवली.  यादरम्यान ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबवलं आणि दंड वसूल केला. तसेच यापुढे नियमांचं पालन करण्याची सूचनाही त्यांनी बादशाहला दिली. हा कार्यक्रमआयोजित केला गेला होता जिथे पोहचण्याच्या नादात त्यांच्याकडून चूक घडली.


 


'इतका' भरला दंड


या कार्यक्रमात लवकर पोहचण्यासाठी त्यांने ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करत गाडी चुकीच्या मार्गावरुन चालवली. त्याच्याकडून हे कृत्य घडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला दंड ठोठावला. त्यामुळे बादशाहला 15 हजार 500 रुपयांचा दंड भरावा लागला. बादशाह अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. बादशाहच चाहतेदेखील त्याच्याबद्दलची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियात शेअर करत असतात. त्यातूनच ही बातमी समोर आली. सोशल मिडीयावर चाहत्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण त्याच्या बाजुने बोलत आहेत तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत.


हे ही वाचा ः सासू-सुनेत All is not well? नीतू कपूरने आलियाला केलं इग्नोर; ती आई-आई म्हणत राहिली, पण...


बादशाहाच्या आधी अनेक कलाकारांना वाहतूक नियम मोडल्याने दंड भरावा लागला आहे.


काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aryan) मुंबईत वाहतूक नियम मोडल्याचा फटका बसला. तो प्रभादेवी इथे सिद्धिविनायक मंदिरात चालला होता. यावेळी त्याने नो-पार्किंग झोनमध्ये आपली लॅम्बोर्गिनी उरूस पार्क केली होती. वाहतूक पोलिसांच्या हे निदर्शनास आले. यानंतर त्याच्याकडून दंडाची मोठी रक्कम वसूल करण्यात आली.