14 डिसेंबर रोजी कपूर कुटुंबीयांनी दिवंगत अभिनेते आणि फिल्ममेकर राज कपूर यांची 100 वी जयंती साजरी केली. मुंबईत साजरा झालेला राज कपूर फिल्म फेस्टिवल हा एक रेड कार्पेट इव्हेंट होता. यामध्ये राज कपूर यांचे 10 अतिशय सुंदर सिनेमे दाखवण्यात आले. यावेळी रणबीर कपूर आणि आलिया यांची जोडी लक्षवेधी ठरली. रणबीर कपूर काळ्या रंगाचा बंदगळ्याचा कुर्ता घातला होता तर आलिया एव्हरग्रीन फुलांच्या सब्यासाचीच्या पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेट साडीमध्ये दिसली. या सगळ्यासोबत आणखी एका गोष्टीची चर्चा झाली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात आलिया आणि नीतू कपूर यांच्या नोकझोक पाहायला मिळाली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत आलिया नीतू कपूर यांना भेटायला जाते. हाक मारण्याचा प्रयत्न करते. ती सतत आई आई अशी हाकही मारते. एवढंच नव्हे तर आलिया सासूबाईंचा हाथ पकडण्याचा देखील प्रयत्न करते. पण सासूबाई म्हणजे नीतू कपूर चक्क इग्नोर करताना दिसत आहे. त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे आलिया भट्ट खूप गोंधळलेली दिसली. महत्त्वाचं म्हणजे नेटिझन्सही ही गोष्ट पाहिली आहे. नीतू कपूर यांनी आलियाला इग्नोर केल्याची चर्चा सुरु आहे.
महत्त्वाचं म्हणजे यावेळी रणबीरची चलुत बहीण करीना कपूर खान आलियाला शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील एका व्हिडीओत दिसत आहे. आलिया अतिशय तणावात दिसत असून अचानक असं का घडलं या विचारात दिसत आहे.
चाहत्यांच्या कमेंट
नीतू आणि आलियाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनेक कमेंट देखील आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया देखील तितकेच लक्षवेधी आहे. एका युझर्सने कमेंट केलं आहे की, 'सासूने सूनेला केलं इग्नोर'. दुसरा चाहता म्हणतो की,'सासूने सुनेला इग्नोर करणं हे परमनंट आहे.'
हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आलिया भट्टसोबत असा प्रकार याआधीही घडला आहे. नीतू कपूर आणि आलियामध्ये काही आलबेल नसल्याचं आधीही दिसून आलं होतं.