Baby Names Meaning : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. या पावर कपलने दुसऱ्या मुलाचं स्वागत केलं आहे. 15 फेब्रुवारी रोजी विराट-अनुष्काच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. विराटने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट-अनुष्काने आपल्या मुलांना दिलेली नावे अतिशय युनिक आहेत. त्यामुळे ती कायमच चर्चेत राहतात. पण या नावांच विराट-अनुष्काच्या नावांशी खास कनेक्शन आहे. ते कनेक्शन काय आहे आणि आता तो कसा ट्रेंड होत चालला आहे. हे देखील पाहणार आहोत. 


अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलांचे नाव उत्तम प्रकारे निवडले आहे . त्यांच्या स्वतःच्या नावांमध्ये आणि मुलांच्या नावांमध्ये एक अनोखा संबंध देखील सेट केला आहे. त्यांच्या मुलीचे नाव 'वामिका' हे विराटच्या अक्षराने सुरू होते, म्हणजे V म्हणजेच 'व' अक्षरावरून, आणि त्यांच्या मुलाचे नाव 'अकाय' हे अनुष्काच्या अक्षराने सुरू होते, A म्हणजे 'अ'.


(हे पण वाचा - अनुष्का शर्माने गरोदर असल्याची Good News, 'या' कारणांमुळे लपवली)


विराट-अनुष्काने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "अतिशय आनंदाने आणि आमच्या प्रेमाने भरलेल्या अंतःकरणासह, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले आहे! तुमचा आशिर्वाद असावा. आम्ही तुम्हाला विनंती करतो की यावेळी आमच्या खासगी वेळेचा आदर करावा. 


स्टार फलंदाज आणि प्रसिद्ध अभिनेत्रीने 11 डिसेंबर 2017 रोजी Tuscany, Italy  येथे एका खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली. 11 जानेवारी 2021 रोजी या जोडप्याने वामिकाचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. त्यांच्या लग्नानंतर सहा वर्षांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचे दुसरे अपत्य 'अकाय'चा जन्म झाला. विराट अनुष्काप्रमाणे अनेक पालकांना आपल्या मुलाचे नाव आपल्या नावाच्या आद्याक्षरावरून ठेवायचे आहे. अशावेळी तुम्ही खालील नावांचा विचार करु शकता. 


(हे पण वाचा - बाळासाठी 2nd Chance घेणाऱ्या पालकांनी विराट-अनुष्काकडून 'ही' गोष्ट शिकावीच; तुम्हालाही होऊ शकतो फायदा)


'अ' अक्षरावरून मुलांची नावे आणि अर्थ 


आरोही - संगीताची आवड असलेले लोक. ते लोक त्यांच्या मुलीचे नाव आरोही ठेवू शकतात. याचा अर्थ म्युझिकल नोट्स.


अनिका - अनिका नावाचा अर्थ देवी दुर्गा आणि सुंदर मुलगी आहे. अनिका नाव तुमच्या प्रियकरासाठी देखील सर्वोत्तम असेल.


आन्या - या नावाचा अर्थ दयाळू आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीचे नाव अन्या ठेवू शकता.


आरव - नावाचा मुलाच्या वर्तनावर खोलवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मुलाचा शांत स्वभाव हवा असेल तर तुम्ही आरवला ठेवू शकता. त्याचा अर्थ शांततापूर्ण आहे.


आहान - या नावाचा अर्थ सूर्योदय आणि प्रकाशाचा पहिला किरण आहे. हे नाव मुलासाठी सर्वोत्तम आणि अद्वितीय आहे.


'व' अक्षरावरून मुलांची नावे आणि अर्थ 


वायु - हवा, वाऱ्याच्या वेगाचा असा या नावाचा अर्थ आहे. मुलासाठी हे नाव नक्कीच निवडू शकता. 


विवान - जीवनात भरपूर प्रमाणात आणि सूर्याची किरणे असा या नावाचा अर्थ होतो. अतिशय युनिक असं हे नाव आहे. 


विराज - ब्रम्हांड, सूर्याचा राजा... मुलासाठी तीन अक्षरी परफेक्ट नाव.


वृष - बलवान असा या नावाचा अर्थ असून मुलासाठी दोन अक्षरी खास नावं.


वीर - अतिशय साहसी, वीर पुरुष असा या नावाचा अर्थ आहे.