Virat Kohli Anushka Sharma Second Child : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. 15 फेब्रुवारी रोजी अनुष्काने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. विराट-अनुष्काने आपल्या मुलाच नाव 'अकाय' ठेवलं आहे. विराट अनुष्काची मोठी मुलगी 'वामिका' साडे तीन वर्षांची आहे.
विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, "आम्हाला सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर वेळी आम्ही खूप आनंदी आहोत. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा. यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो."
विराट-अनुष्काने पहिल्या बाळाला 11 जानेवारी 2021 रोजी जन्म दिला. 'वामिका' असं पहिल्या मुलीचं नाव असून आता ती 3 वर्षे 1 महिन्यांची आहे. वामिकाच्या जन्मानंतर जवळपास तीन वर्षांनी विराट-अनुष्काने दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विचार केला. दोन मुलांमध्ये नेमकं किती अंतर असावं? याचा काय फायदा होतो. हे आपण रिसर्चद्वारे जाणून घेणार आहोत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये सुमारे 24 महिन्यांचे अंतर असणे खूप महत्वाचे आहे. कारण 24 महिन्यांत महिलेचे आरोग्य पूर्णपणे सुधारलेले असते. जर तुम्ही 24 महिन्यांच्या अगोदर दुसऱ्या मुलाला जन्म देत असाल तर ते अंतर कमीत कमी 18 महिन्यांच असणं गरजेचे आहे.
Healthline च्या रिपोर्टनुसार, रॉबर्ट हॅमिल्टन, एमडी, FAAP, सांता मोनिका, कॅलिफोर्निया येथील प्रोव्हिडन्स सेंट जॉन्स हेल्थ सेंटरमधील बालरोगतज्ञ, म्हणाले की या निर्णयामध्ये अनेक घटक आहेत. यामध्ये आईचे वय, पालकांचे आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक समस्या यांचा देखील विचार केला जातो.
पहिल्या गर्भधारणेसह 18 महिन्यांपेक्षा कमी अंतरावर वैद्यकीय गुंतागुंत होण्याचा धोका आणि अतिरिक्त ताण अधिक असतो. त्याशिवाय यापेक्षा कमी अंतर 'आदर्श अंतर' मानले जात नाही. कॅलिफोर्नियाच्या फाउंटन व्हॅलीमधील मेमोरियलकेअर ऑरेंज कोस्ट मेडिकल सेंटरमधील बालरोगतज्ज्ञ, जीना पोस्नर, एमडी यांनी सांगितले की, त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा मुले एक वर्ष किंवा दीड वर्षाच्या आत जन्माला येतात, तेव्हा पालक सुरुवातीला खरोखर तणावग्रस्त असतात. मुलांच्या अंतराच्यावेळी पालकांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.