अनुष्का शर्माने गरोदर असल्याची Good News, 'या' कारणांमुळे लपवली

Anushka Sharma : अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे. पण तिच्या गरोदरपणाची माहिती अजिबातच कुणाला माहित नव्हती. असं नेमकं कोणतं कारण होतं ज्यामुळे अनुष्का शर्माने आपल्या दुसऱ्या गरोदरपणाची माहिती सगळ्यांपासून लपवून ठेवली. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 22, 2024, 03:35 PM IST
अनुष्का शर्माने गरोदर असल्याची Good News, 'या' कारणांमुळे लपवली  title=

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई झाल्याची गोड बातमी सध्या चर्चेत आहे. अयोध्या मंदिराच्या अभिषेक पूजेला विराट आणि अनुष्का उपस्थित न राहिल्याने या बातमीने जोर पकडला होता आणि आता उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या ट्विटने या बातमीने चांगलीच खळबळ उडाली आहे. हर्षने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'आता काही दिवसात मुलाचा जन्म होणार आहे. बघूया तो वडिलांसारखा क्रिकेटर बनतो की आईप्रमाणे चित्रपटात काम करतो.

आता प्रत्येकजण असा अंदाज लावत आहे की, हे कपल अनुष्का आणि विराट आहे कारण विराट क्रिकेटशी संबंधित आहे आणि अनुष्का एक अभिनेत्री आहे आणि आजकाल त्यांच्या मुलाच्या आगमनाच्या बातम्या सर्वत्र चर्चेत आहेत. अनुष्कासारख्या महिलांना त्यांच्या प्रेग्नेंसीची बातमी लपवायची कारण काय असू शकते? अनुष्काने आपली गर्भधारणा का लपवली असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याची कारणे जाणून घ्या. 

कॉम्प्लिकेशन्स असतील तर 

गरोदरपणात काही गुंतागुंत असेल तर महिलांना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची गर्भधारणा लपवायची असते. तिला फक्त एवढीच काळजी आहे की, प्रथम तिचे मूल निरोगी जन्माला येईल, त्यानंतरच ती ही बातमी कोणालाही सांगेल. घरच्यांना माहिती आहे, पण याच्या बाहेर तिला ही बातमी कुणाला सांगायची नाही.

प्रायव्हसी 

अनुष्का आणि विराटच्या बाबतीत, कदाचित याच कारणामुळे ते त्यांच्या चाहत्यांसोबत ही बातमी शेअर करत नाहीत. या दोघांनी आजपर्यंत आपली मुलगी वामिकाचा चेहरा कोणाला दाखवला नाही आणि आता त्यांनी आपल्या दुसऱ्या बाळाची माहिती देखील लपवली होती. 

मिसकॅरेजची भिती

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत गर्भपात होण्याची भीती जास्त असते, त्यामुळे या काळात खुद्द डॉक्टरही ही बातमी अनेकांना सांगण्याचा सल्ला देत नाहीत. पहिल्या गरोदरपणात तीन महिने पूर्ण झाल्यानंतरच अनुष्कानेही ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तीन महिन्यांपर्यंत तुम्ही तुमच्या गर्भधारणेबद्दल कोणालाही सांगू नका, असा सल्लाही डॉक्टर देतात.

प्रश्नांपासून दूर राहण्यासाठी

 मीडिया आणि लोकांचे प्रश्न टाळण्यासाठी अनेकदा अभिनेत्री आणि सेलिब्रिटी त्यांच्या गरोदरपणाच्या बातम्या लपवतात आणि अनुष्काच्या बाबतीतही हेच कारण असू शकते.

पहिलाच अनुभव 

एखाद्या अभिनेत्रीने आपल्या प्रेग्नेंसीची बातमी इतक्या दिवसांपासून लपवण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. आलिया भट्टसारख्या अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मात्र, अनुष्काच्या गर्भधारणेची अद्याप पुष्टी झालेली नव्हती. विराट कोहलीने आपण दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी शेअर केली. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x