Maharashtra Politics: `एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अॅक्शनमध्ये नाना पाटेकर`
Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Bachchu Kadu On Eknath Shinde: दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील काही आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अयोध्येचे दौरा केला होता. यावेळी शिंदे गटातील काही आमदार अयोध्येत दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. शिंदे गटात काहीतरी बिनसलंय का? असा सवाल आता उपस्थित होत असताना संजय राऊतांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटात घुसमीरीचं वातावरण तयार केलंय. त्यावर आता शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतूक केलं आहे.
काय म्हणाले Bachchu Kadu?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी (Bachchu Kadu On Eknath Shinde) म्हटलं आहे. आम्ही मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो नाही तर, कामासाठी शिंदे यांच्यासोबत गेलो होतो. असं स्पष्टीकरण देखील बच्चू कडू यांनी दिलंय. फक्त 8 महिन्यांसाठी मंत्रीपद घेण्यात काहीही अर्थ नाही, त्यामुळे मी नाराज नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार?
मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) हा 2024 नंतरच होणार आहे, असं विधान देखील त्यांनी केलंय. त्यामुळे आता अनेक आमदारांच्या मंत्रीपदाच्या आशा मावळल्याचा पहायला मिळतंय. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मी कामात व्यग्र होतो, त्यामुळं आम्हाला अयोद्धेला जायला जमलं नाही, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय.
दरम्यान, एकाच व्यक्तीकडे 8 ते 9 जिल्हे असल्यानं लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत, त्यावर काम केलं पाहिजे, असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र आता बच्चू कडू यांच्या वक्तव्याने अनेक आमदारांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळत आहे.