Beed Pankja Munde Vs Bajarang Sonavane :  लोकसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल बीड मतदार संघात पहायला मिळाला. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना धूळ चारली. तब्बल 32 फे-यांपर्यंत आघाडी पिछाडीच्या हिंदोळ्यावर इथली लढत रंगली होती. अखेर बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. बजरंग सोनवणे यांनी 6हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.  निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट आला आहे. पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलीये.. जातीय निहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करताना योग्य माहिती दिली नसल्याचा आरोपही करण्यात आलंय...खासदार सोनवणे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस बाजवली असून चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सोनवणे यांना कोर्टाने दिले आहेत. निवडणुका जाहीर होण्याच्या तीन दिवस आधी अचानक 7 बूथ जाहीर झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. हे बूथ नोटिफायड नव्हते असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे. 


बीड हा तसा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. गेली 15 वर्षं बीड भाजपचा गड आहे. यंदा भाजपने प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिले.  बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष 2009 पासून पाहायला मिळालाय. यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे उघडउघडपणे मराठा-ओबीसी संघर्षाची चर्चा झाली. येथे गोपीनाथ मुंडेंपासून भाजप ओबीसी चेहरा देत आहे. पंकजा मुंडे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांनी बीडमध्ये मोठा डाव टाकला. शेवटच्या क्षणी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देत राष्ट्रवादीनं मराठा कार्ड खेळले.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंनी खासदार प्रीतम मुंडेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. बजरंग सोनवणेंचा 1 लाख 68 हजार मतांनी पराभव करत प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या.