मुंबई : मागील काही दिवसांपासून रखडलेली इयत्ता अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर सुरु होणार आहे. त्यामुळ अकरावी प्रवेशातील अडथळे आता दूर झाल्याचं स्पष्ट होत आहे. गुरुवारी म्हणजेच 26 नोव्हेंबरला ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑनलाईन पद्धतीनं सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणं एसईबी आरक्षणाशिवाय ही प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर हा मुद्दा निकाली निघत नाही तोवर प्रवेश प्रक्रिया करु नये अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात आली होती. पण, तूर्तास मराठा आरक्षणाला स्थगितीच असल्यामुळं आता प्रतिक्षेत असणारे सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. 


 


जीआर काढत याबाबतच्या वृत्तावर शिक्कामोर्तबही करण्यात आलं. शिवाय शिक्षण विभभागाकडून यासाठीचं वेळापत्रकही जारी करण्यात आलं आहे. निकालानंतर ताटकळलेला प्रवेशाचा मुद्दा मार्गी लागत असल्यामुळं विद्यार्थ्यांना हा एक दिलासाच असणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.