सुंदर ते ध्यान! आता दर्शन रांगेतून दिसणार विठु माऊलीचं पुरातन रूप

विठुरायाच्या मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता यावं यासाठी मंदिरातील दर्शन रांगेमध्ये आषाढीपूर्वी समितीकडून महत्त्वाचे बदल केले आहेत.

| Jul 01, 2024, 12:33 PM IST

Pandharpur Vithu Mauli:विठुरायाच्या मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता यावं यासाठी मंदिरातील दर्शन रांगेमध्ये आषाढीपूर्वी समितीकडून महत्त्वाचे बदल केले आहेत.

1/8

सुंदर ते ध्यान! आता दर्शन रांगेतून दिसणार विठु माऊलीचं पुरातन रूप

Pandharpur Vithu Mauli Puratan roop can be seen from the Darshan Queue

विठुरायाच्या मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता यावं यासाठी मंदिरातील दर्शन रांगेमध्ये आषाढीपूर्वी समितीकडून महत्त्वाचे बदल केले आहेत. 

2/8

मंदिराचे पुरातन रूप

त्यामुळे दर्शन रांगेतून भाविकांना मंदिराचे पुरातन रूप अनुभवता येणार आहे.

3/8

जतन आणि संवर्धनाचे काम

मंदिर समितीने जवळपास दोन महिने श्री विठ्ठलाचे मंदिर दर्शनास बंद ठेवून चौखांबी सोळ खांबी, गाभारा या ठिकाणी जतन आणि संवर्धनाचे काम केलं होतं. 

4/8

पूर्वीच्या दर्शन रांगेमध्ये बदल

पुरातन रूप या मंदिराला आता देण्यात आले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने अनेक भाविक दर्शनास येतात या भाविकांना हे मूळ रूप पाहता यावं म्हणून मंदिरातील पूर्वीच्या दर्शन रांगेमध्ये बदल करण्यात आलेत. 

5/8

जुने दगडी रूप

आलेल्या मुख आणि पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना ही मंदिरातील काळ्या पाषाणातील सुंदर मुर्त्या, जुने दगडी रूप डोळे भरून पाहता यावं तसेच यासाठी दर्शन रांगेत हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

6/8

निर्मल वारी आणि हरित वारी

माऊलींच्या पालखी सोहळ्यात प्रशासनाकडून निर्मल वारी आणि हरित वारीचं आयोजन करण्यात आलय. वारक-यांचं आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी आळंदीत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

7/8

पालखीचं पंढरपूच्या दिशेनं प्रस्थान

संत चालले पंढरी, मुखी राम कृष्ण हरि...असं म्हणत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूच्या  दिशेनं प्रस्थान झालं. यानिमित्ताने आळंदीत वारक-यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

8/8

वारकरी तल्लीन

ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आळंदीत दिसून आलं. या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले होते. विठोबा माऊलीच्या गजरात अलंकापुरीने एक वेगळच रूप धारण केलं.