टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस देणारी बीसीसीआय किती श्रीमंत? 24,59,51,82,500 ची संपत्ती

BCCI Prize Money : टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आणि बीसीसीआयने टीम इंडियावर पैशांची बरसात केली. बीसीसीआयने टीम इंडियासाठी तब्बल 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. यानिमित्तने बीसीसीआयच्या श्रीमंतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या यादीत बीसीसीआय पहिल्या स्थानावर आहे. 

| Jul 01, 2024, 12:36 PM IST
1/6

टीम इंडियाने 17  वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियावर पैशांची बरसात केली. बीसीसीआयने टीम इंडियासाठी तब्बल 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. 

2/6

पण इतक्या मोठ्या प्रमाणावर बक्षीस जाहीर केल्याने बीसीसीआय किती श्रीमंत असेल याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेट नियमाक मंडळची एकूण संपत्ती 295 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 24,59,51,82,500 रुपये इतकी आहे. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. 

3/6

भारतात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. इतर कोणत्याही खेळापेक्षा देशात क्रिकेटची लोकप्रियता अधिक आहे. टी20 असो कि एकदिवसीय इतकंच काय तर कसोटी क्रिकेटलाही भारतात स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफूल होतं. त्यामुळे बीसीसीआयला मोठी कमाई होते. क्रिकेटची जी लोकप्रियता भारतात आहे, तितकी संपूर्ण जगात कुठेटच नाही.

4/6

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की आयसीसीच्या एकूण कमाईचा मोठा हिस्सा बीसीसीआयकडून जातो. श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा बीसीसीआयची कमाई 28 टक्के जास्त आहे. 

5/6

बीसीसीआयला क्रिकेटमधल्या कमाईशिवाय आयडीएफसी, ड्रीम 11, पेटीएम, हुंडाई इत्यादी प्रायोजकांशीही जोडले गेलेले आहेत. 

6/6

बीसीसीआयची सर्वाधिक कमाई होते ती इंडियन प्रीमिअर लीगच्या माध्यमातून. आयपीएल ही जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आहे. आयपीएमध्ये खेळण्यासाठी जगभरातील दिग्गज खेळाडू तयार असतात. तब्बल दोन महिने चालणारी आयपीएल स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडिअम हाऊसफुल होतात.