मुंबई : व्यापार, उद्योग क्षेत्रात गेल्या काही काळापासून येस बँक, DHFL अशा घोटाळ्यांमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या अडचणी आणखी वाढणआर आहेत. देशव्यापी लॉकडाऊऩ सुरु असतानाच  वाधवान कुटुंबीयांतील २३ जणांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याकरता व्हीआयपी पास मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व प्रकरणानंतर वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरच्या सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. पण, त्यांच्या या प्रवासामुळे नियमांची झालेली पायमल्ली पाहता आता या प्रवासाच्या सीबीआय CBI चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआय, ईडी कडून वाधवान कुटुंबीयांप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला गेल्याचीही माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वाधवान कुटुंबासमवेत त्यांचे आचारी, नोकर वर्गसुद्धा यावेळी त्यांच्यासोबत होते. ज्यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास खंडाळा ते महाबळेश्वर येथे प्रवास केला. पुणे आणि सातारा हे दोन्ही जिल्हे सक्तीच्या लॉकडाऊऩअंतर्गत असतानाही त्यांनी कोरोना व्हायरसमुळे सुरु असणाऱ्या परिस्थितीचं गांभीर्य न पाळता हा प्रवास केला. 


DHFL घोटाळा : वाधवान कुटुंबीय पाचगणीत क्वारंटाइन


 


वाधवान कुटुंबीयांच्या या प्रवासावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, कारवाईच्या दिशेने पावलंही उचलली जात आहेत. ज्याअंतर्गत या वाधवान कुटुंबियांना शिफारशीचे प्रवासाचं पत्र देण्याऱ्या अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. शिवाय सीबीआयकडूनही कपिल आणि धीरज वाधवान यांना लूकआऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यांप्रकरणी अडचणीत असणाऱ्या वाधवान यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना सीबीआयकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' प्रकरणामुळे नाराज


 


 


मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचं कारण देत ईडीकून पाठवण्यास आलेलं समन्स दुर्लक्षित केलं होतं. शिवाय कोणत्याही प्रकारचा आर्थिक घोटाळा सुरु नसून, आरोग्यालाच आमचं प्राधन्य असल्याचं ते म्हणाले होते.