Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. याच दुर्घटनेसंदर्भात अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत त्यांचे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जनतेची माफी मागितली आहे. मात्र या प्रकरणावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी स्टेनलेस स्टिलच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत पुतळा उभारताना स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर पुतळा पडला नसता असं म्हटलं आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात गडकरींनी केलेल्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. 


गडकरी नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरींनी दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये बोलताना स्टेनलेस स्टिलचा वापर समुद्रकिनारी बांधकाम करताना करणं कसं गजरेचं आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. आपण मागील काही वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावरीस रस्ते आणि त्यावरचे उड्डाणपूल बांधताना स्टेनलेस स्टिलच्या वापरलावर भर देत असल्याचं गडकरींनी सांगितलं. स्टेनलेस स्टिलचा वापर केल्यास समुद्रावरुन येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे गंज धरण्याची समस्या निर्माण होत नाही आणि बांधकाम भक्कम राहून दिर्घकाळ टिकतं असं गडकरींच्या सांगण्याचा रोख दिसून आला. गडकरींनी ही माहिती देताना महाराष्ट्रात 55 उड्डाण पूल बांधल्याचा उल्लेख केला. त्यावेळेस एका पहाणीदरम्यान समुद्रकिनाऱ्यावरील उड्डाण पुलासाठीच्या सळ्यांवर कोटिंग पावरडर वापरल्यानंतरही सळ्यांना गंज चढत असल्याचं दिसून आल्याचं सांगितलं.


हाच संदर्भ देत समुद्रकिनाऱ्यापासून 3 किलोमीटरच्या परिघामध्ये बांधकाम करताना स्टेनलेस स्टिलचा अधिक वापर केला पाहिजे असं विधान गडकरींनी केलं. "मलावणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा कोसळला नसता," असं गडकरी जुन्या गोष्टीशी काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेशी जोड देत म्हटलं. 


नक्की वाचा >> मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'


गडकरींच्या विधानावर पवार काय म्हणाले?


केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरींनी केलेल्या या विधानासंदर्भात आज कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी, "नितीन गडकरी केंद्रातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी एखादं काम हाती घेतलं तर ते मन लावून ते काम करतात. त्या कामाचा बारकाईने अभ्यास करतात," असं म्हणत गडकरींचं कौतुक केलं.


नक्की वाचा >> 'शेतकरी पण लाडका हे...', राज ठाकरेंची शिंदे सरकारकडे मागणी! कार्यकर्त्यांना म्हणाले, 'आपलं वाटोळं...'


पुढे बोलताना, "कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी ते (गडकरी) घेतात. देशातील अनेक रस्ते त्यांनी उत्तम पद्धतीने बांधलेत. आम्ही हे संसदेमध्येही मोकळेपणे सांगितलं आहे. गडकरींनी पुतळ्याच्या कामाबद्दल काही मत व्यक्त केलं असेल तर त्यांनी नक्कीच त्याचा अभ्यास केला असेल," असं शरद पवार म्हणाले.