मुंबई : 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, 'बालकांड' 'एक माणूस एक दिवस', यांसारख्या एकापेक्षा एक दर्जेदार पुस्तकांचे लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे आज निधन झाले. त्यांच्या दर्जेदार साहित्याने मराठी वाचकाला भूरळ घातली. असे सर्वसमावेशी लिखाण करणाऱ्या साहित्यिकाच्या साहित्यसंपदेवर टाकलेला हा कटाक्ष...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हमोंनी अनेक मासिके आणि वृत्तपत्रांसाठी लिखाण केले. त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात काम केलं. तसंच लोकप्रभा, पुढारी, घरदार, मार्मिक, नवशक्ती आदी नियतकालिकांसाठीही लिखाण केलं. त्यांच्या लिखाणाला सुरूवातीपासूनच वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, 'त्यांच्या 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी', या कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले. समिक्षकांनीही या कादंबरीवर विशेष प्रेम दाखवले. आज ही कादंबरी अनेक विद्यापिठांमधून अभ्यासासाठी ठेवण्यात आली आहे.


१९५६मध्ये साप्ताहिक जनयुगच्या दिवाळी अंकात ह. मो. मराठेंची पहिली नाटिका प्रकाशित झाली. त्यानंतर 'साधना' साप्ताहिकात ''निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.


ह. मो. मराठे यांची, 'अण्णांची टोपी' (कथासंग्रह), 'काळेशार पाणी' : संहिता आणि समीक्षा (वैचारिक), 'इतिवृत्त', 'देवाची घंटा', 'चुनाव रामायण' (व्यंगकथा), 'घोडा', 'टार्गेट', 'ज्वालामुखी' (कथासंग्रह), 'न लिहिलेले विषय' (वैचारिक), 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारट (१९७२), 'पहिला चहा' ((भाग 1, 2). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.), 'पोहरा' (आत्मकथा; ’बालकांड’चा 2रा भाग), 'द बिग बॉस' (व्यंगकथा), 'दिनमान' (उपरोधिक लेख), 'इतिहासातील एक अज्ञात दिवस' (कथासंग्रह)'आजची नायिका (उपरोधिक), 'उलटा आरसा' (उपरोधिक) ही काही गाजलेली पुस्तके आहेत.


यासोबतच, एक माणूस एक दिवस (भाग 1 ते 3), कलियुग, प्रास्ताविक, बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग – पोहरा), बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक – ह.मो. मराठे), माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा), युद्ध, लावा (हिंदी), वीज (बाल साहित्य), श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा), सॉफ्टवेअर, स्वर्गसुखाचे यांसह ह मो मराठे यांची इतर पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.