रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बाप्पाच्या आगमनादिवशी म्हणजे कालपासून बरसायला सुरुवात केली  आहे. 


२४ तासात जिल्ह्यात ५९ मिलिमिटर पाऊस पडलाय. सर्वात जास्त पावसाची नोंद ही चिपळूण तालुक्यात ११२ मिलिमिटर पाऊस झालाय. त्याखालोखाल लांजा ९८ मिलिमिटर संगमेश्वर ७२ मिलिमिटर राजापूर ६२ मिलिमिटर पावसाची नोंद झालीय. 


आत्तापर्यत २४६८ मिलिमिटर पावसाची नोंद झालीय. मात्र जिल्ह्यात यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ८०० मिमी पाऊस कमी पडला आहे.