Samruddhi Mahamarg: ठरलं तर `या` दिवशी होणार `समृद्धी` महामार्गाचं उद्घाटन, PM Modi दोनवेळा करणार महाराष्ट्र दौरा?
Inauguration Samruddhi Mahamarg: अखेर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे.
Maharashtra Samruddhi Mahamarg : गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा (Inauguration Samruddhi Mahamarg) मुहूर्त लांबला जात होता. अखेर या महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबरला महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. मोदी यावेळी समृद्धी महामार्गासह नागपूर मेट्रो फेज-2 उद्घाटन करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी प्रशासनही तयारीला लागलं आहे. (Inauguration 11 December of Maharashtra Samruddhi Mahamarg latest marathi news)
आगामी काळात येणाऱ्या निवडणुका आणि यंदाचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधीच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्नभूमीवर मोदींचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे 15 ऑगस्टला करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली होती. मात्र 15 लाही मुहूर्त हुकला, त्यानंतर शिंदे यांनी महामार्ग लवकरच खुला होणार असल्याची घोषणा केली होती.
इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनासाठी नागपूर मोदी जानेवारीत महिन्यामध्ये महिन्यामध्ये येणार आहेत. त्याचवेळी समृद्धी महामार्ग आणि मेट्रो सुरू होईलं असं म्हटलं जात होतं. मात्र त्याआधीच मोदी एकदा येऊन जाणार आहेत. त्यामुळे मोदींचा दोनवेळा महाराष्ट्र दौरा होणार असल्याचं बोललं जात आहे.